आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरेपणाच्या नावाखाली 28 कोटींचा काळाबाजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- स्वच्छ, सुंदर चेहरा आणि गोरेपणासाठी मुलीच काय, अलीकडच्या काळात तर मुलंदेखील काहीही करायला तयार आहेत. गोरेपणा मिळवून देण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या उत्पादक कंपन्यांनी विणलेल्या जाळ्यांमध्ये दरवर्षी 18 हजारांवर अमरावतीकर अडकतात. हा काळाबाजार थोडाथोडका नव्हे, तर तब्बल 28 कोटी रुपयांचा आहे.

बहुतांश फेस वॉश, फेअरनेस क्रीममध्ये घातक रसायने असल्याची भीती दाखवून आणि आयुर्वेद, हर्बल उत्पादनाच्या नावाखाली बाजारात सुमारे दीडशे अशी उत्पादने आहेत, ज्यांनी तरुणाईला विळखा घातला आहे. बहुतांश उत्पादनांमध्ये अ‍ॅलोवेरा, तुळस, हळद, चंदन, गुलाब, स्ट्रॉबेरी यांचा अर्क असल्याचे बेधडकपणे नमूद केले जाते. अगदी 20 रुपयांत चंदन पावडर विकली जात आहे. 35 रुपयांच्या किमतीत अ‍ॅलोवरा समाविष्ट असल्याचा दावा करीत वेगवेगळे फेसवॉश, साबण विकले जात आहेत. मात्र, त्याचा किंचिंत अंशही या उत्पादनांमध्ये नसतो, असे मत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. योगेश झंवर यांनी व्यक्त केले.

घातक औषधांचेही सेवन
तरुणांच्या चेह-यावर मुरुम, पुटकुळ्या (पिंपल्स) येणं स्वाभाविकच. परंतु, देखण्या चेह-याच्या नादात तरुणाई एक दिवसही चेह-यावर कोणता डाग सहन करू शकत नाही. त्यामुळे मुरुम येऊ लागताच त्यासाठी अँटिएलर्जिक, अँटिबायोटिक आणि अँटिपिंपल उपचार सुरू केले जातात. या उपचारांमुळे अनेकदा तरुणाईच्या जनुकीय रचनेवरही परिणाम होत आहेत.

क्रीमने गोरेपणा कसा येईल?
प्रत्येकाच्या त्वचेचा रंग, रूप वेगवेगळे असते. केवळ क्रीम किंवा फेस वॉश वापरून गोरेपणा कसा येईल? जाहिरातीच्या युगात तरुणाईदेखील अनेक उत्पादनांच्या दाव्यांना बळी पडते आणि आपली त्वचा खराब करून घेते. असे क्रीम वापरणे, औषधे घेणे अयोग्य आहे. डॉ. उज्ज्वल बारंगे, कॉस्मेटिक सर्जन

उत्पादन वापरणे घातक
त्वचारोग तज्ज्ञ म्हणून गोरेपणा आणि पिंपल्ससंबंधी समस्या घेऊन येणारे सर्वाधिक तरुण असतात. माझ्याकडे दररोज किमान 15 लोक या समस्येसाठी येतात. खरं तर गोरेपणासाठी किंवा मुरुमांसाठी कोणतेही उत्पादन वापरणे घातक आहे. डॉक्टर असलो तरी मी चेहरा केवळ पाण्याने धुतो. मी कोणतेही क्रीम, फेस वॉश, लोशन वापरत नाही.
डॉ. योगेश झंवर, त्वचारोग तज्ज्ञ