आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीवायएसपी झाले तर्र, मद्यपी पोलिस उपअधीक्षकांचे कार्यालयातच लोटांगण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती परिक्षेत्राच्या पोलिस बिनतारी संदेश यंत्रणेच्या कार्यालयात सोमवारी अजब नाट्य घडले. या कार्यालयाचे तसेच परिक्षेत्राचे बिनतारी संदेश यंत्रणेचे प्रमुख म्हणून कार्यरत नितीन अनंत जुवेकर या पोलिस उपअधीक्षकाने मद्यप्राशन करत कार्यालयातच लोटांगण घातले. त्यांचे असे वागणे नित्याचेच झाल्याचा आरोप करत कंटाळलेल्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फ्रेजरपुरा पोलिसांना याची माहिती दिल्‍यावर पोलिसांनी या मद्यधुंद अधिकाऱ्याला वाहनात टाकून नेले.

सोमवारी दालनातच लोटांगण : सकाळी११.३० वाजेदरम्यान जुवेकर कार्यालयात आले, तेव्हा त्यांना चालताही येत नव्हते. प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान केल्याने त्यांना आपण काय करतोय, याचेही भान नव्हते. दालनात प्रवेश केल्यावर त्यांनी खुर्चीएेवजी थेट जमिनीवरच बैठक ठाेकली.

सहकाऱ्यांनीहीटेकले हात : जुवेकरांचेकार्यालयातील पद पाहता अनेक कामे त्यांच्या या तळीरामगिरीमुळे रखडलेली असल्याचे त्यांचे कार्यालयातील सहकारीच सांगतात. सातत्याने मद्य प्राशन करणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन करणे अशा त्यांच्या ‘लीलां’ना कंटाळलेल्या सहकाऱ्यांनी सोमवारी थेट फ्रेजरपुरा पोलिसांनाच पाचारण केले. जानेवारी २०१५ ला पुणे येथे असलेल्या बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलिस महासंचालक मुंबई येथील पोलिस महासंचालकांना फॅक्सद्वारे या संदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ए. आर. साखरे यांनी दिली.

उचलून टाकले वाहनात
जुवेकरयांच्या लीलांची फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक शिशिर मानकर पथक त्या ठिकाणी पोहोचले. नाईलाजाने पोलिसांनी त्यांना उचलून वाहनात टाकले. आपल्यापेक्षा एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा पद्धतीने वागणूक देण्याशिवाय पोलिसांपुढेही दुसरा पर्याय नव्हता.

कोण हे जुवेकर ?
जुवेकरहे मुंबईचे असून, २०१२ पासून अमरावती परिक्षेत्रित बिनतारी संदेश यंत्रणेच्या कार्यालयात कार्यरत आहेत. कार्यालय परिसरात त्यांचे निवासस्थान असल्याची माहिती याच कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांनी दिली.अखेर नितीन जुवेकर यांना फ्रेजरपुरा पोलिसांनी उचलूनच गाडीत टाकले.

कारवाई होणारच
-उपअधीक्षकिनतीन जुवेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कारवाई करतील, त्या कारवाईचा आम्हाला अहवाल प्राप्त होईलच. त्या अहवालावरून नियमाने जी कारवाई करायची आहे, ती आम्ही करणार आहोत. पी.टी. सोनोने, अधीक्षक,बिनतारी संदेश यंत्रणा, नागपूर.

वैद्यकीयचाचणीतही मद्य घेतल्याचे आले पुढे
-सोमवारीआम्हाला फाेन आल्यानंतर आम्ही जुवेकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये जुवेकर यांनी मद्य घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ८५ अन्वये तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक ए. आर. साखरे यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा अहवाल संबंधित विभागाला पाठवला जाईल. डी.सी. खंडेराव, पोलिसनिरीक्षक, फ्रेजरपुरा.

एका डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने कार्यालयात अशा प्रकारे वर्तन केल्याने पोलिसांनी वैद्यकीय अहवालाच्या आधारावर नितीन जुवेकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हा अहवाल अमरावती शहर पोलिसांनी आता िबनतारी संदेशच्या पुणे येथील अतिरिक्त महासंचालकांना पाठवला असून, यानंतर जुवेकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे.