आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊरायाला बहिणीची ई-ओवाळणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आधुनिक काळात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी जगभरात जाणार्‍यांची भाऊबीज साजरी करण्यासाठी इंटरनेटसारख्या आधुनिक माध्यमांकडे कल वाढत आहे. शेकडो मैल लांब राहणार्‍या भाऊरायाला बहीण इंटरनेटच्या माध्यमातून ई-ओवाळणी घालते आहे. भाऊबीज साजरी करण्याची ही अभिनव संकल्पना आता रूढ होऊ लागली आहे.

आधूनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीच्या दोन टोकांवर राहणारे भाऊ -बहीण भाऊबिजेच्या दिवशी संगणकाच्या पडद्यावर एकमेकांना बघून हा दिवस आनंदाने साजरा करत आहेत. अमरावतीमधील काही कुटुंबांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अशी ई-दिवाळी तसेच अनेक सण साजरे केले जातात. इच्छा असूनही परदेशात राहणारी बहीण भाऊबिजेच्या दिवशी येऊ शकत नाही, तर मायदेशातील बहिणीकडे भाऊबिजेसाठी भाऊ पोहोचू शकत नाही. त्यामुळे नात्यांचे बंध जपण्यासाठी इंटरनेट माध्यमेही महत्त्वाची ठरत आहेत. त्याचा प्रभावीपणे वापर करून घेण्यास शिकले पाहिजे.


पडद्यावरच ओवाळणी
व्हिडीओ कॉन्फर्न्‍सिंग,चॅटिंग, व्हिडीओ कॉल आणि थ्री-जीसारखे आधुनिक, गतिमान इंटरनेट यांच्या अनोख्या एकत्रीकरणामुळे जगाच्या पाठीवर कोणत्याही देशातील व्यक्ती संगणकाच्या पडद्यावर एकमेकांना बघू शकतात. संवाद साधू शकतात. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने बहीण भावाला संगणकाच्या पडद्यावर बघूनच ओवाळणी घालते. अमरावतीत राहणारे संदीप गोडबोले हे दरवर्षी अशाच पद्धतीने भाऊबीज साजरी करतात.

अमेरिकेत आहे बहीण संगणक अभियंता
माझी बहीण संगीता दिलीप बर्मन (गोडबोले) ही अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये डरहम येथे संगणक अभियंता आहे. 1998 पासून ती तेथे आहे. तिथे जाण्याची तयारी असली तरी व्हिसा तातडीने मिळत नाही. अडचणी येतात. त्यामुळे आम्ही बहीण-भाऊ 2005 पासून इंटरनेटवरूनच दिवाळी साजरी करतो. संदीप गोडबोले, ऑप्टिकल व्यावसायिक,