आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार आला चार वेळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सर्वात कमी दिवसांचा महिना अशी ओळख असलेल्या फेब्रुवारी महिन्यात एक दुर्मीळ योग जुळून आला असून, यंदा या महिन्यामध्ये प्रत्येक वार चार वेळा आला आहे. सध्या हा मेसेज व्हॉट्सअॅप, फेसबुकवर वेगाने फिरत आहे. रविवारी (दि. १) फेब्रुवारीपासून ते शनिवारपर्यंत (२८ फेब्रुवारी) सातही वार चार वेळा आले आहेत.

दरम्यान, वर्ष २०१५ मध्ये एकूण २५ सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. यांपैकी तीन सुटी जानेवारीमध्ये होत्या. उर्वरित २२ सुटी १२ महिन्यांमध्ये आहेत. फेब्रुवारी, जून, आणि ऑगस्ट महिना वगळता इतर सर्व महिन्यांतील सार्वजनिक सुट्या या शनिवार रविवारला जोडून आलेल्या आहेत. विशेषत: बहुतांश सुट्या या शुक्रवारी आल्याने सुटीचा चांगला मेळ जुळून आला आहे.