आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economic Offences Wing,latest News In Divya Marathi

‘राणा लँडमार्क’च्या महत्त्वाच्या फाइल्स जप्त,आर्थिक गुन्हे शाखेकडून कार्यालयाची झडती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कमीदरात आणि सुलभ हप्त्यात फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘राणा लँडमार्क’विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रविवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून राणा लँडमार्कच्या कार्यालयाची तब्बल तीन तास झडती घेण्यात आली.
या वेळी व्यवहारातील कागदपत्रे असलेल्या महत्त्वाच्या फाइल्स अन्य कार्यालयीन साहित्य पोलिसांनी जप्त केले. शहरातील काँग्रेसनगर मार्गावर असलेल्या राणा कॉम्पलेक्समध्ये राणा लँडमार्कचे कार्यालय आहे. याच कार्यालयातून राणा लँडमार्कचे सर्व व्यवहार सुरू होते. योगेश राणाला अटक केल्यानंतर रविवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या कार्यालयाची तीन तास झाडाझडती घेण्यात आली. या वेळी राणाने ग्राहकांसोबत केलेल्या व्यवहाराची कागदपत्रे असलेल्या शेकडो फाइल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यासोबतच कार्यालयातील एक संगणक, की बोर्ड, सीपीयू, ग्राहकांना इसारारूपात दिल्या जाणाऱ्या पावत्यांचे बुक, लँडमार्कच्या कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, कार्यालयाबाहेर आतमध्ये असलेले राणा लँडमार्कचे फलक यांसह अन्य महत्त्वाचे दस्तऐवज कार्यालयातील साहित्य जप्त करून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यालयाला टाळे ठोकले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तूतार्स राणा लँडमार्कचा संचालक योगेश राणाला अटक केली आहे. मात्र, या प्रक्रियेत योगेश राणासोबत असलेल्यांचा नेमका काय सहभाग आहे, याची चौकशी पोलिस करत आहेत. त्यामुळे अनेकांची चौकशी सुरू आहे. राणा लँडमार्ककडे कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचे पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. आगामी काळात अटकेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तक्रारींचीसंख्या वाढली : राणालँडमार्कने ९६२ ग्राहकांना फ्लॅटचे आरक्षण दिल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मात्र, सुरुवातीला तक्रारींची संख्या कमी होती. राणाला अटक झाल्यानंतर ग्राहकांच्या तक्रारींचा आेघ वाढला आहे. सध्या २९० ग्राहकांनी तक्रारी दिल्या आहेत.

प्रकरणाचा सखोल तपास सुरू
योगेशराणाची चौकशी सुरू असून, या प्रक्रियेत आणखी किती व्यक्ती सहभागी आहेत, त्याची माहिती आम्ही घेत आहोत. तपासाचा एक भाग म्हणून त्याच्या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या अनेक फाइल्स रविवारी जप्त केल्या आहेत. चौकशीदरम्यान दोषी आढळलेल्या व्यक्तींना अटक करण्यात येणार आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. गणेशअणे, पोलिसनिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.