आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"कोरी पाटी' भरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एक महिन्याच्या आत शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश दिला जाणार असून, प्रशासनाने त्यादृष्टीने तयारीदेखील सुरू केली आहे. शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवार, जुलै रोजी एकाच वेळी राबवण्यात आली. मोहिमेतील कर्मचाऱ्यांनी दारोदारी जात शाळाबाह्य बालक हुडकून काढण्याचे कार्य केले. सर्वेक्षकांच्या हाती लागलेल्या प्राथमिक माहितीची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.
समाजात असलेला निरक्षरतेचा ठपका भविष्यात कायम राहू नये, म्हणून सर्वच बालकांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. आरटीई २००९ च्या कायद्यानेदेखील बालकांना सक्तीचे शिक्षणाचा हक्क दिला आहे. कायद्याने अधिकार मिळाला असला, तरी अनेक अडचणींमुळे काही बालकांना शाळेत जाता येत नाही. ‘शाळेला चाललो आम्ही...’ म्हणण्याची हौस असली, तरी परिस्थितीमुळे तिला मुरळ घालावी लागते. मात्र, महाराष्ट्रात एकही बालक शाळाबाह्य राहू नये, याची खबरदारी खुद्द शासनाने घेतली आहे. राज्यात एकाच दिवशी शाळाबाह्य बालक शोधमोहीम राबवण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात आले.
शिक्षण विभागावर या सर्वेक्षणाची प्रमुख जबाबदारी टाकण्यात आली. सर्वच विभागांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर होती. मतदान असो की जनगणना आदी कामांमध्ये तत्पर असलेल्या शिक्षकांनीदेखील शाळाबाह्य शोधमोहिमेत जोमाने भाग घेतला. सकाळी वाजेपासून सायंकाळी वाजेपर्यंत नेमून दिलेला संपूर्ण परिसर कर्मचाऱ्यांनी पिंजून काढला. कॉलनी असो की गलिच्छ वस्ती अादी सर्व ठिकाणी शोधमोहिमेतील कर्मचारी आढळून आले.
पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर हे सर्वेक्षण करावयाचे असल्याने प्रत्येक घरावर नोंददेखील करण्यात आली. वस्त्या, वाड्या, वीटभट्ट्या, मुस्लिमबहुल क्षेत्र यांसह सर्वच भागांमध्ये शाळाबाह्य बालकांचा शोध घेताना कर्मचारी आढळून आले. शाळादेखील सकाळी ११ ते दुपारी या वेळेत घेण्यात आल्या. एका झोनसाठी १०० कुटुंब संख्या लक्षात घेण्यात आली.

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०११ मध्ये जिल्ह्यात ३३१४ शाळाबाह्य बालक आढळून आले होते. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाकडून २०११ मध्ये जिल्ह्यातील शहरी भागात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ते वर्षे वयोगटातील ४२७ बालक, ते १४ वर्षे वयोगटांतील २२५३ बालक, तर १४ वर्षेवरील ६३४ शाळाबाह्य मुलांचा समावेश होता.
येथे विशेष पाहणी
झोपडपट्टीतीलमुले, खेडे, गाव, वाडी, पाडे, तांडे, गुऱ्हाळघर, गावाबाहेरची पाल, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंब, फुटपाथ, सिग्नलवर, भीक मागणारी मुले, तमाशा कलावंतांची वस्ती, भटक्या जमाती, तेंदुपत्ता वेचणारी, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, जंगलात वास्तव्य करणाऱ्या बालकांचा शनिवारी शोध घेण्यात आला.
शाळेत नावे नोंदवू
शाळाबाह्यबालकांना एक महिन्याच्या आत त्यांना शाळेत टाकण्याची व्यवस्था केली जाईल. त्यांची नावे सोयीच्या शाळांमध्ये नोंदवली जाणार आहे. आदिवासी मुस्लिमबहुल भागांमध्ये सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. किरणगित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती.
समाधाननगरात शिक्षिकांनी घरोघरी जाऊन शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण केले.
पुढे काय : सर्वेक्षणानंतरजिल्ह्यात किती शाळाबाह्य बालक आहेत. याचा आकडा समोर येणार आहे.