आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील २९७ गावांत ‘एक गाव एक गणपती’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘एकगाव एक गणपती’साठी अनेक गावं सरसावली आहेत. जिल्ह्यात यंदा तब्बल २९७ गावकऱ्यांनी तसा निर्धार केला आहे. राज्यभरात गणेशोत्सव मोठ्य उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, मध्यतंरीच्या काळात उत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळांमध्येच मिरवणुकीवरून वाद झडायला लागले होते. त्यामुळे, अनेकदा तणावाची स्थितीही निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा.
त्यावर तोडगा म्हणून ‘एक गाव एक गणपती’ही कल्पना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामुळे गावातील एकात्मता कायम राहण्यासोबतच उत्सवाचा उत्साह कायम राहिल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. नागरिकांनीही यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गावे मोठ्या प्रमाणात सामोरे येत आहेत. गणरायाचे २९ ऑगस्टला आगमन होणार आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार १६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी २९७ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ राहणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिस दलातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. गणेश उत्सवादरम्यान संपूर्ण जिल्हाभरात मांगल्याचे आनंदाचे वातावरण राहावे, अशी मनोकामना करण्यात येत आहे. नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, उत्सव शांततेत साजरा करावा, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी केले आहे.