आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकविरा मातेचा जयघाेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एकविरा देवीच्या मुळ मुर्तीवरील अडीच फुटाची खोळ बुधवारी अचानक घसरल्याने मुर्तीचे पुरातन रुप समाेर आले आहे. यापुढे सर्व भाविकांना एकविरा मातेची मुळ मूर्तीच दर्शनाप्रसंगी दिसणार आहे. मंदीर विश्वस्तांनी गुरूवारी याबाबतची माहीती पत्रकार परीषदेत दिली.
अंबादेवी व एकविरा देवी हे विदर्भाचे आराध्य दैवत आहे. या देवींचे भक्त केवळ विदर्भात, राज्यातच नव्हे तर देशभर आहेत. मूर्तीवर शेंदूराचे थर असल्याने अातापर्यंत एकविरा देवीच्या मुळ मूर्तीचे दर्शन हाेत नसे. अंदाजे चारशे वर्षांपूर्वी या मूर्तीची स्थापणा झाली असून त्यानंतर कालांतराने त्याच मुर्तीवर शेंदूराचा मुलामा चढवण्यात आला आहे.
पाच दिवस साजरा हाेणार दीपोत्सव
देवीची मुळ रुपातील मूर्ती दिसल्यामुळे सर्व भाविकांसह विश्वस्तांनाही आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी गुरूवारपासून पाच दिवस मंदिर परिसरात अानंदाेत्सव साजरा करण्यात येणार असून पाच दिवस सायंकाळी मंदिर परिसरात शेकडो दिप लावण्यात येणार असल्याची मािहती गुरुवारी विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.