आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशमुख समर्थक, भाजप नेत्यांत वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जनविकास काँग्रेस कार्यालयासमोर सुरू असलेल्या नालीच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले असता, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे समर्थक माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक कोमल बोथरा, पप्पू पडोळे यांच्याकडून धक्का-बुक्की करण्यात आल्याचा आरोप भाजपचे गटनेते संजय अग्रवाल यांनी केला आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, भाजप कार्यालयातही याचे पडसाद दिसले.

पक्षाचे जिल्ह्यातील नेते या प्रकरणाला घेऊन प्रत्येक घडामोडीची माहिती वरिष्ठांना देत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. सुनील देशमुख हे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली. विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रवीण पोटे, माजी मंत्री जगदीश गुप्ता, शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्यासह भाजपमधीलच तब्बल १६ जणांनी उमेदवारीवर दावेदारी केली आहे. देशातील परिवर्तनाच्या लाटेत सर्वांनाच स्वार व्हायचे असल्याने ऐकमेकांची उणे- दुणे बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेतील गटनेते संजय अग्रवाल यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडल्याने भारतीय जनता पक्ष कार्यालयातदेखील वेगवान घडामोडींना वेग आला. डॉ. देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेनेच अनेक भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. अशा असंतुष्टांची मोट बांधण्याचा प्रकार भाजप कार्यालयातून झाल्याची माहिती आहे. या प्रकाराची तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे संजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील या वेगवान घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र आहे. संजय अग्रवाल डॉ. देशमुख समर्थकांमध्ये झालेला वाद कोणत्या विकोपाला जाईल, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

धक्काबुक्की केली नाही
संजयअग्रवाल यांच्यासोबत कोणताही वाद झाला नाही तसेच धक्का-बुक्की देखील केली नाही. अग्रवाल यांनी केलेले आरोप खोटे असून याबाबत विनाकारण वाद वाढवला जात आहे. धक्का-बुक्की केल्याचे म्हणणे खाेटे आहे. काेमलबोथरा, नगरसेवक
नालीवरून वाद
मॉडेलरेल्वे स्थानकासमोर असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ नालीची पाहणी करीत असताना हा वाद निर्माण झाला. डॉ. सुनील देशमुख समर्थकांकडून धक्का-बुक्की करण्यात आली. येथील मंदिराचा काही भाग तोडण्याची भाषा केली जात असल्याने मी त्याला विरोध केला होता. यावरून हा प्रसंग झाला. संजयअग्रवाल, गटनेतेभाजप
माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या भाजप प्रवेशापूर्वीच शहरातील राजकारण तापले आहे. नालीच्या क्षुल्लक कारणावरून देशमुख समर्थक भाजप नेते संजय अग्रवाल यांच्यादरम्यान आज चांगलीच वादावादी झाली. मॉडेल रेल्वे स्थानक मार्गावरील जनविकास काँग्रेसच्या कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेला राजकीय रंग चढला.
कार्यालयात दिवसभर बैठका
संजयअग्रवाल प्रकरणानंतर राजापेठ स्थित भाजप कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. आमदार डॉ. रणजित पाटील शहरात असल्याने राजकीय घडामोडी वाढल्या होत्या. भाजप कार्यालयात नेमक्या कोणत्या कारणाने बैठका होत होत्या, हे मात्र गुलदस्त्यात होते. अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये ‘टशन’ वाढली आहे.
काही दिवसांपूर्वीचा वाद
भारतीयजनता पक्ष प्रवेशास रोडा बनणार असल्याचे संकेत संजय अग्रवाल यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांना देण्यात आले होते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महायुतीतील वाद संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली असून, लवकरच उमेदवारांची