आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगराध्यक्षांना मुदतवाढ; उपाध्यक्षांची मात्र निवडणूक; 27 जूनला दहाही नगरपालिकांमध्ये बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नगराध्यक्षांना मुदतवाढ देत असतानाच उपाध्यक्षांची निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आल्याने जिल्ह्यातील दहाही नगरपालिकांमधील राजकीय वातावरण तापले आहे. 27 जूनला विशेष सभेमध्ये उपाध्यक्षांची निवड केली जाईल.

अडीच वर्षांचा कालखंड संपायला आल्यामुळे चिखलदरा वगळता जिल्ह्यातील सर्व दहाही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक होणार होती; परंतु राजकीय फायदा-तोटा लक्षात घेता शासनाने अलीकडेच नगराध्यक्षांना सहा महिन्यांसाठी जीवदान दिले. मात्र, उपाध्यक्षांना यातून वगळण्यात आले. परिणामी, नियत कालमर्यादेनुसार सर्व उपाध्यक्षांना आपापली खुर्ची सोडावी लागणार आहे.

दरम्यान, उपाध्यक्षांच्या निवडणुकीबाबतचा आदेश जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी नुकताच जारी केला असून, तो सर्व नगरपालिकांना पाठवण्यात येत आहे. असाच एक आदेश एसडीओ कार्यालयांनाही पाठवण्यात आला आहे. त्यांना व तहसीलदारांनाच या बैठकांचे संचालन करावयाचे आहे.

अमरावती जिल्ह्यात ‘अ’ वर्गाची अचलपूर, ‘ब’ वर्गाची अंजनगावसुर्जी व वरुड, तर अन्य सर्व नगरपालिका ‘क’ वर्गा दर्जाच्या आहेत. यामध्ये मोर्शी, शेंदुरजनाघाट, चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे व चिखलदºयाचा समावेश आहे. यांपैकी चिखलदरा ही अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गासाठी आरक्षित असल्याने तेथील निवडणूक नंतर घेतली जाणार आहे.
संभ्रम कायमच!
नगराध्यक्षांना मुदतवाढ दिली; मात्र उपाध्यक्षांना न दिल्याने मुदतवाढीचा निर्णय राजकीयदृष्ट्या प्रभावीत असल्याचे स्पष्ट होते. या निर्णयाने राज्यभरात रोष उमटला असून, उपाध्यक्षांना मुदतवाढ का नाही, असा संबंधितांचा प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वी महापौरांबरोबरच उपमहापौरांनाही मुदतवाढ देण्यात आली होती.
सकाळी 10 ला बैठक
27 जूनला सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. डीपीओ (जिल्हा प्रकल्प अधिकारी) कार्यालयातून पाठवल्या गेलेल्या पत्रांमध्ये बैठकीचे वेळापत्रक नमूद आहे. नामांकन, माघार व निवडणूक अशा तीन टप्प्यांमधून ही बैठक पूर्णत्वास जाणार आहे. त्या-त्या तालुक्याचे एसडीओ व तहसीलदारांना या बैठकीचे संचालन करावयाचे आहे.