आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Symbol Issue At Amravati, Divya Marathi

गाजर, फुग्याला उमेदवारांची नापसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा - अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी 87 निवडणूक चिन्हांपैकी गाजर आणि फुगा या चिन्हांना नापसंती दर्शवली. गाजर दाखवले, फुगा फुटला, असे उपाहासात्मक बोलले जात असल्यामुळे उमेदवारांनी या दोन्ही चिन्हांवर फुली मारली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तब्बल 87 निवडणूक चिन्हे घोषित केली होती. मंगळवारी (दि. 25) निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी राष्ट्रीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. त्यात राष्ट्रीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना संबंधित पक्षांचे अधिकृत चिन्ह मिळाले. त्यामध्ये भाजप-शिवसेना-रिपाइं (आठवले) महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना ‘धनुष्यबाण’, राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांना ‘घड्याळ’, बसपचे गुणवंत देवपारे यांना ‘हत्ती’, ‘आप’च्या भावना वासनिक यांना ‘झाडू’, तर 16 अपक्ष उमेदवारांमध्ये रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांना ‘पतंग’, संजय आठवले यांना ‘छताचा पंखा’, सुनील डोंगरदिवे यांना ‘खाट’, प्रिया डोंगरे ‘दूरदर्शन’, ज्योती माकोडे ‘कोट’, रमेश रामटेके ‘कपबशी’, हरिदास शिरसाठ ‘पाटी’, आशा अभ्यंकर ‘गॅस सिलिंडर’, किरण कोकाटे ‘शिवणयंत्र’, ज्योती देवकर ‘गॅस शेगडी’, बंडू साने ‘फळा’, मनोहर सोनोने ‘नारळ’, राजू मानकर ‘एसी’, विश्वनाथ जामनेकर ‘फलंदाज’ आणि राजू सोनोने यांनी ‘शिटी’ या चिन्हाला पसंती दिली. गाजर, फुगा, कपाट, ऑटोरिक्शा, फळाची टोपली, बॅटरी, डबलरोटी, बाटली, ब्रश, केक, कॅलक्युलेटर, कॅमेरा, बुद्धिबळ पट, डिझेल पंप, विजेचा खांब, लिफाफा, बासरी आदी चिन्ह उमेदवारांकडून नाकारली गेले आहेत.
निवडून आल्यावर गाजर दाखवणार, त्याचा फुगा फुटणार अशा शब्दात हेटाळणी केली जात असल्याचा हा परिणाम आहे.