आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हायटेंशन’चा झटका; भाजलेला युवक गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- यशोदानगर परिसरातून गेलेल्या हायटेंशन वीजवाहिनीचा झटका लागल्याने शुक्रवारी 28 वर्षीय युवक गंभीररीत्या भाजला. त्याच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहे. रोशन चंद्रशेखर देशमुख (28, रा. नांदसावंगी, नांदगाव खंडेश्वर) असे जखमी युवकाचे नाव आहे. रोशन हा यशोदानगरमध्ये जितेंद्र मधुकर देशमुख (जावई) यांच्याकडे राहतो. त्यांच्या घराच्या छतावर ताडपत्री टाकण्यासाठी तो घरावर चढला होता. घरावरून गेलेल्या हायटेंशन विद्युतवाहिनीला रोशनच्या जवळूनच गेलेल्या एका साध्या ताराचा स्पर्श झाला. त्यामुळे त्याला विद्युत झटका बसला. झटका इतका जोरदार होता, की रोशनचे हात, पाय, छाती भाजली गेली. त्याला गंभीर अवस्थेत इर्विनमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हायटेंशन विद्युतवाहिनीचा शॉक लागण्याच्या शहरात तीन घटना घडल्या असून, धोकादायक ठरत आहेत. यशोदानगर भागातून जाणारी हायटेंशन विद्युतवाहिनी 55 वर्षांपेक्षा जुनी अहे. नागरी वस्तीतून ही वाहिनी काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केल्याचे या प्रभागाचे नगरसेवक अविनाश मार्डीकर यांनी सांगितले. यासंदर्भात महावितरणच्या अधीक्षक-अभियंत्यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.