आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electrical Connection Not Provide To Farmor Issue At Amravati

प्रगत शेती करण्याचे स्वप्न वितरणने मिळवले धुळीस, नाही दिले विद्युत कनेक्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सहा महिन्यांनंतरही शेतात विजेचे कनेक्शन मिळाले नसल्याची तक्रार दस्तुरनगर अशोक स्टेट बँक कॉलनी निवासी देवराज तिवारी (सुभेदार भवन) यांनी केली आहे. वीज नसल्यामुळे इच्छा असूनही त्यांना प्रगत शेती करता आली नाही. किमान पुढचा हंगाम तरी वाया जाऊ नये म्हणून लवकर वीज मिळावी, यासाठी त्यांचा लढा सुरू आहे.

देवराज तिवारी यांनी २१ जुलै रोजी वीज कंपनीच्या कार्यालयात वीज कनेक्शनच्या मागणीचा अर्ज दिला होता. चांदूर रेल्वे तालुक्यातील १२ एकर शेताच्या ओलितासाठी त्यांना वीज कनेक्शन हवे आहे; परंतु तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यावरही संबंधित अधिकाऱ्यांनी काहीच केल्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकारात त्या अर्जाचे काय झाले, अशी विचारणा केली. या अर्जामुळे जागे झालेल्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाच नोव्हेंबर २०१४ रोजी सर्वेक्षण करून त्यांचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठवला. परंतु, त्यानंतरही तिवारी यांच्या शेतात वीज कनेक्शन पोचण्याचा मार्ग सुकर झाला नाही. त्यामुळे आता हा लढा वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांच्या दालनात पोहोचला आहे. एकीकडे आधुनिक शेती करण्यासाठी प्रशासनच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असते; परंतु शेतकऱ्यांना अशा अडचणींचा सामना रोजच करावा लागतो.
प्रतिज्ञापत्रही दिले, आता पुढे काय ?
-शेतीला लागणाऱ्या गरजांसाठी तिवारींनी अडीच लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव बँकेसमोर ठेवला. त्यांची तळमळ परतफेडीची तयारी बघून बँकेनेही त्यांना कर्ज पुरवठाही केला. शेतात निरनिराळे पीक प्रयोग करता यावे म्हणून त्यांनी प्रशिक्षणही घेतले. परंतु वीज कनेक्शनअभावी हे सर्व व्यर्थ जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. देवराजतिवारी, शेतकरी.

तिवारी यांची पीडा अत्यंत मर्मस्पर्शी आहे. शेती विकसित करण्यासाठी त्यांनी बी.ई. (कॉम्प्युटर) शिकलेल्या पुण्यात नोकरी करणाऱ्या मुलाला त्याच्या आवडीनुसार नोकरी सोडून येथे बोलावले. एमबीए शिकणाऱ्या दुसऱ्या मुलानेही शेतीलाच प्राधान्य दिल्‍यामुळे त्यालाही शेतीत गुंतवले. परंतु, वीज कनेक्शन नसल्यामुळे सध्या ते हतबल झाले आहेत.
खांब उभारण्याचा खर्च, वायर आदी सर्व सामग्री स्वत: घेण्यास तयार आहे. दोन्ही मुलांनाही शेतीची कास धरायची आहे. केवळ वीज कनेक्शन नाही म्हणून मला पुढे जाता येत नाही, हीच अडचण आहे. आता हाच मुद्दा घेऊन मी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना भेटणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.