आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electronic Voting Machine News In Marathi, New Voters, Amravati Lok Sabha Constituncy

प्रथमच मतदान करताय; जरा Electronic Voting Machine समजून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नव्याने मतदार झालेल्या जिल्ह्यातील सुमारे 40 हजार, ज्यापैकी 32 हजार अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतात, त्या नवमतदारांसाठी हा जरा नवा प्रयोग आहे. त्यामुळे त्यांना ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन) काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.


भली मोठी मतपत्रिका, तिची विशिष्ट आकारातील घडी, सुरुवातीला ती उघडायची नंतर पसंतीच्या (उमेदवाराच्या) नावासमोर शिक्का मारायचा आणि नंतर पुन्हा घडी करून ती पेटीत डांबायची. असे पूर्वीसारखे मतदान आता वेळखाऊ राहिले नाही. 2004 पासून होणार्‍या निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रिय सहज सोपी झाली आहे. मतदान केंद्रात जायचे आणि स्वत:ची ओळख पटवून दिली, की फक्त एक बटण दाबायचे. झाले मतदान. अशी सध्याची स्थिती आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात 19 उमेदवार असल्यामुळे या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर तीन यंत्र मिळून ईव्हीएम तयार झालेले असेल. हे तिन्ही यंत्र एकमेकांना जोडलेले असतील. त्यातील दोन बॅलेट यूनिट (बीयू) तर तिसरे कंट्रोल यूनिट (सीयू) असेल. पहिल्या बीयूवर 16 उमेदवारांची नावे आणि त्यांचे निवडणूक चिन्ह दिसून येईल, तर उर्वरित तीन उमेदवार आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेला नोटा (नन ऑफ द अबव्ह) हा पर्याय दुसर्‍या यंत्रावर असेल.
आपल्याला ज्यांना मतदान करायचे, त्या 19 उमेदवारांची नावे क्रमागत पद्धतीने ईव्हीएमवर दिसून येईल. यांपैकी जो तुमच्या पसंतीचा उमेदवार आहे, त्याच्या नावासमोरील निळे बटण दाबावे लागेल. हे बटण दाबताच मशिनच्या अग्रभागी असलेला लाल रंगाचा दिवा लुकलुकणार असून, एक लांब शीळ (बीप) वाजेल. पसंतीच्या उमेदवारालाच मतदान झाल्याचा हा एकप्रकारचा पुरावा आहे. सर्व मतदारांचे मतदान आटोपले की, संबंधित केंद्राधिकारी मशिनच्या मागील बाजूस असलेले ‘क्लोज’ बटण दाबणार असून, त्याचवेळी त्या केंद्रावरील एकूण मतदानही कळणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरामध्ये खात्री करून घेण्यासाठी मतदारांची यादीसुद्धा असणार आहे.


पुढे वाचा केव्हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा वापर सुरू झाला ?