आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठोर नियम: भाजीबाजारात इलेक्ट्रॉनिक्स वजनयंत्रांची सक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- कृषिउत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार भाजीबाजारात अडत्यांना इलेक्ट्रॉनिक वजनयंत्र सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबतची नोटीस सर्व अडत्यांना देण्यात आली असून, त्याचे पालन न करणाºयांंविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार आहे.
परवानाधारक अडत्यांकडून बाजार समितीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे प्रशासक नानासाहेब चव्हाण यांच्या लक्षात आले. यामुळे शेतकºयांची फसवणूक होत आहे. चव्हाण यांनी नोटीस काढून अडत्यांना बाजार समितीच्या नियमांची आठवण करून दिली आहे. कृषी विक्री अधिनियम 1963 व 1967 अन्वये काही नियम ठरवून दिले आहेत. परंतु, त्याचे पालन होत नाही. यात शेतकरी व ग्राहकांचे नुकसान होत असल्याचे दिसून आले. अडत्यांना यापुढे तागडी-पारड्याचा वापर करता येणार नाही. नियमानुसार अडत्यांना आपल्या दुकानाची सफाई ठेवून कचरा कचरापेटीतच टाकणे बंधनकारक आहे. समितीने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त दुकानासमोर किंवा शेडच्या पुढे खुल्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. खरेदीदारांना तीन प्रतीत खरेदी बिल देणे बंधनकारक आहे. अडत्याने अडतपट्टी किंवा खरेदीदारांना द्यावयाची बिले प्रत्यक्ष झालेल्या सौदा किमतीची द्यावी. अडत्याने आपले अडतपट्टी बूक व बिल बूक त्रयस्थ नागरिकास व्यवहाराकरिता देऊ नये. अडतपट्टी बूक, बिल बूक समितीने ठरवून दिलेल्या नमुन्यात व विशिष्ट आकारात छापून समितीच्या कार्यालयातून प्रमाणित करून घ्यावे. समितीने ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आत शेतमालाची किरकोळ विक्री करू नये. या नियमांचे पालन न करणाºयांवर कायेदशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी नोटिसीद्वारे म्हटले आहे.

अतिक्रमणावरील व्यवसायास बंदी
बाजार समितीने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त दुकानासमोर किंवा शेडच्या समोर, अनधिकृत खुल्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे.