आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीडशेवर इमारतींना मनपा लावणार टाळे, बाजार परवाना विभाग करणार धडक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील दीडशेवर व्यावसायिकांनी महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे लायसन्स घेताच घोडे दौडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये ७१ मंगल कार्यालये, ७० बार रेस्‍टॉरेंट्स आणि १३ कोचिंग क्लासेसचा समावेश आहे. संबंधितांच्या या अनधिकृत कृतीला मनपाने गंभीरतेने घेतले असून, ही सर्व व्यावसायिक ठिकाणे ‘सील’ करण्याचा इशारा दिला आहे.

वारंवार नोटीस देऊनही संबंधित व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आयुक्त अरुण डोंगरे यांच्या निर्देशानुरूप उपायुक्त चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनात संबंधित इमारती सील करण्याची (टाळे लावण्याची) कारवाई लवकरच केली जाणार आहे. दरम्यान, बाजार परवाना विभागातर्फे केली जाणारी ही कारवाई अत्यंत धाडसी स्वरूपाची राहणार असल्याने त्यासाठी अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र चमू तयार करण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी पोलिस प्रशासनाचीही मदत घेतली जाणार आहे.

‘एडीटीपी’करणार कारवाई
परवानाघेता व्यवसाय थाटण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. ही बाब लक्षात येताच संबंधितांना तसे सांगण्यात आले. परंतु शहरातील दीडशेवर मंगल कार्यालये, विविध लॉन्स, बार रेस्टारेंट, ट्युशन क्लासेस, हॉटेल्स आदींच्या संचालकांनी परवानाच घेतला नाही. त्यामुळे संबंधितांविरुद्ध नगररचना विभागाच्या सहायक संचालकांमार्फत (एडीटीपी) कारवाई केली जाणार आहे.

कायआहे मनपा अधिनियम?
शहरातकोणताही व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३७६ (ब) ३८६ अन्वये बाजार परवाना विभागाचे लायसन्स घेणे आवश्यक आहे.

परवाना घ्यावा; अन्यथा कठोर कारवाई
कारवाईचा कृती आराखडा आखण्यात आला असला तरी मनपाचे धोरण लवचीक आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी संपर्क साधून परवाना प्राप्त करून घ्यावा. अन्यथा सर्वांिवरुद्ध कारवाई केली जाईल. गंगाप्रसादजयस्वाल, बाजार परवाना विभाग, मनपा, अमरावती.

बार रेस्‍टॉरेंट असे ही मंगल कार्यालये
न्यू आदित्य गार्डन, हॉटेल करण, गार्डन ग्लोरी, हॉटेल हिदुस्तान इंटरनॅशनल, हॉटेल कृष्णा, शाल रेस्टारेंट, हॉटेल राज प्लाझा, हॉटेल क्रेझ, कलिंगा रेस्टारेंट, लॉर्डस् रेस्टारेंट, हॉटेल डिमलँड, गॅलॅक्सी गार्डन रेस्टारेंट, हॉटेल सम्राट, हॉटेल सनराईज, साईनी रिसोर्ट, आशीर्वाद, मोहिनी, आरती, मंगलम, प्रेसिडेंट, बैठक रेस्टारेंट,सिटी क्लब, नीलम हॉटेल, हॉटेल सूर्या, व्हिंटेज वाइन बार, सेव्हन पीएम रेस्टारेंट, व्हाईट कॅसल, सुरुची गार्डन, हॉटेल टुरिस्ट, रिफॉर्म्स क्लब, विक्रम राजा, रसोई रेस्टारेंट, हॉटेल श्रीपाद, गौरी वाईन्स, खंडेलवाल वाईन शॉप, करण बीयर शॉपी, हॉटेल रामगिरी, रॉयल रेस्टारेंट आदी.

नंदा हॉल, लोहाना महाजन वाडी, गोपाळप्रभा मंगल कार्यालय, उजंबावाडी, माहेश्वरी समाजमंदिर, जवादे मंगल कार्यालय, दोशीवाडी, अग्रसेन भवन, धर्मदाय कॉटन फंड, अहिल्या मंगल कार्यालय, शिरभाते मंगल कार्यालय, ब्राह्मणसभा सांस्कृतिक भवन, स्वयंवर मंगल कार्यालय, लहानुजी मंगल कार्यालय, दीपार्चन हॉल, ओस्तवाल भवन, सुयोग, रुद्रेश, जाधव, स‍िद्धार्थ, जयभारत, असनारे,जिजामाता मंगल कार्यालयांसह महेश भवन, देशमुख लॉन, खंडेलवाल लॉन, नटेश्वर लॉन, मल्लिका लॉन, रोहिणी पार्क लॉन, ग्रँड महफीलचे लॉन, नेमानी इन लॉन, मनोर मांगल्य लॉन, नेमानी इनचे लॉन आदींचा समावेश आहे.