आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील अतिक्रमणाने गिळला 15 % भाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विकासाच्या दिशेने वेगाने धावत असलेल्या अमरावतीचा सुमारे 15 टक्के भाग अतिक्रमणाने गिळला आहे. कुठे, किती अतिक्रमण होत आहे किंवा झाले आहे, याची ठाम आकडेवारी महसूल, महापालिका अथवा कोणत्याही प्राधिकारिणीजवळ नसली, तरी अधिकारीच इतके अतिक्रमण असल्याचे मान्य करीत आहेत.

सर्वाधिक अतिक्रमण रस्ते, फूटपाथ आणि पार्किंगच्या जागांवर झाले आहे. रस्त्यांवर दुकाने आणि हातगाड्यांचे अतिक्रमण आहे. फूटपाथवर दुकानदारांचे, तर पार्किंगच्या जागांवर आॅटोरिक्षाचालक, हॉकर यांचे अतिक्रमण झाले आहे. दरवर्षी हे अतिक्रमण एक ते 1.22 टक्क्यांनी वाढतच आहे. वेळीच यावर ठोस उपाय न केल्यास आगामी दहा वर्षांत अतिक्रमणाखाली असलेले क्षेत्र 15 टक्क्यांवरून 22 टक्के होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अमरावतीचे एकूण क्षेत्रफळ सध्या 121.65 वर्ग किलोमीटर आहे. ‘स्वच्छ, सुंदर अमरावती’चा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढावे लागेल. शहराचा श्वास अतिक्रमणात कोंडला असून, तो मोकळा करण्यासाठी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.
ठाम आकडेवारी अनुपलब्ध
- एकूण क्षेत्रफळापैकी नेमक्या किती क्षेत्रावर अतिक्रमण असेल, याची आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु, तक्रार प्राप्त झाल्यास शहानिशा करून अतिक्रमण हटवले जाते. सवर्साधारणपणे 12 ते 15 टक्के अतिक्रमणाचे प्रमाण असते. सु. पुं. कांबळे, सहायक संचालक (नगर रचना)

सर्वेक्षण नाही; कारवाई होते
- अमरावती महापालिका अतिक्रमणाचे सर्वेक्षण करीत नाही. जेथे अतिक्रमण असेल तेथे कारवाई करते. त्यामुळे कुठे, किती अतिक्रमण झालेय किंवा होतेय, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. आम्ही आमची नियमित कारवाई करीत असतो. भूषण पुसदकर, जनसंपर्क अधिकारी (मनपा)