आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांनो, इर्विनमध्ये या, हात-पाय तोडून घ्या! ऑर्थोपेडिक, ओपीडी वॉर्डसमोरच धोकादायक खड्डे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्हासामान्य रुग्णालयात (इर्विन) मागील अनेक दविसांपासून मुख्य मार्गांपासून रुग्णालय परिसरातील मार्गांवर खड्डे आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या नालीचे हे खड्डे असून, ते सतत उघडे असल्यामुळे अनेकदा रात्रीच्या वेळी त्यामध्ये व्यक्ती पडतात; तरीही ढिम्म इर्विन प्रशासनाने अजूनही हे खड्डे झाकलेले नाहीत. त्यामुळे धडधाकट मनुष्यसुद्धा इर्विनमध्ये कधी रुग्ण होईल, याचा नेम नाही.

इर्विन रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर अपघात कक्षात जाण्यासाठी नेहमीच धावपळ असते. मात्र, याच अपघात कक्षासमोर मागील दोन महिन्यापंासून खड्डा आहे. त्यावरील, झाकण बाजूने किंवा अर्धे खड्ड्यावर ठेवलेले असते. मात्र, तो खड्डा पूर्णपणे झाकून ठेवत नाही. हा खड्डा अंदाजे चार फूट किंवा त्यापेक्षा खोल असून, त्याची रुंदी जवळपास दोन फूट आहे. रात्रीच्या वेळी या खड्ड्यात अनेकदा रुग्णालयात येणारे व्यक्ती पडले आहेत. आजपर्यंत कुणालाही गंभीर स्वरूपाची इजा झाल्यामुळे या प्रकरणाचा ऊहापोह झालेला नाही. मात्र, हे खड्डे उघडे ठेवण्यामागे इर्विन प्रशासनाचा काय हेतू आहे, हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरील प्रकरण आहे. याशिवाय, रुग्णालयाच्या आतमध्ये वाॅर्ड क्रमांक १६ समोर एक सांगून तब्बल चार अशाच प्रकारचे खड्डे असून, त्यांवरही झाकण नाहीत. शिवाय, हे खड्डे घाणीच्या पाण्याने भरलेलेे असतात. त्या खड्ड्यांची लांबी रुंदी अपघात कक्षासमोरील खड्ड्याप्रमाणेच आहे. या खड्ड्यातही अनेकदा लोक पडत असल्याचे रुग्णालयातील काहींनी सांगितले. हे खड्डेसुद्धा मागील अनेक दविसांपासून उघडे ठेवले आहेत.

इर्विन रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण तर उपचार घेतात. मात्र, धडधाकट व्यक्ती रुग्णालयात काही कामासाठी आला तर या खड्ड्यात पडून तो केव्हा रुग्ण होईल, याचा काही नेम नाही. या गंभीर विषयाची इर्विन प्रशासनाला जाण नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून िवचारला जात आहे. प्रशासनाला समजते तर खड्डे झाकले का जात नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. येथे सध्या अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी खड्डे उघडे ठेवण्याचे कारण असावे, असे वाटत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

इर्विन परिसरात असलेले हेच ते खड्डे. ओपीडीच्या अगदी समोरच असलेला हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. रात्रीच्या वेळी लक्षात आल्याने नागरिक पडतात.
काम सुरू असल्यामुळे खड्डे उघडे असतील

सध्यारुग्णालय परिसरात भुयारी गटार योजनेची कामे सुरू आहेत. कदाचित त्यामुळेच हे खड्डे उघडे असतील. या बाबतीत परिपूर्ण माहिती माझ्याकडे नाही. संबंधित विभागाला विचारणा करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. डॉ.पारेख, प्रभारीनिवासी वैद्यकीय अधिकारी इिर्वन रुग्णालय.
खड्ड्यांमध्ये घाणच घाण
इर्विनमध्येघाण ही बाब आता नवीन नाही. मात्र, जे खड्डे उघडे आहेत, ते इतक्या घाणीने भरलेलेे असतात, की बाजूने गेले तरी त्याची जाणीव होते. जो कुणी व्यक्ती त्या खड्ड्यांमध्ये पडेल, त्याला संपूर्ण अंग धुतल्याशिवाय चैन पडणार नाही. या खड्ड्यांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर काहीच परिणाम होत नाही का, असाही प्रश्न सुज्ञ नारिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात स्वच्छता असणे गरजेचे आहे. मात्र, इिर्वनमध्ये सध्या या खड्ड्यांमुळे सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य आहे.