आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, HSC Exam Issue At Amravati, Divya Marathi

हुश्श! पहिला पेपर छान गेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचा मराठी विषयाचा पहिला पेपर गुरुवारी झाला. परीक्षा केंद्रातून निघाल्यावर विद्यार्थ्यांनी ‘हुश्श! पहिला पेपर छान गेला,’ असा आनंद व्यक्त केला.

अमरावती जिल्ह्यातून नियमित विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी असे एकूण 34 हजार 507 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विविध शाखांचा मराठी विषयाचा पहिला पेपर गुरुवारी विद्यार्थ्यांनी सोडवला. पहिला पेपर असल्यामुळे थोडेसे टेन्शन होते. पण, पेपर एकदम सोपा होता. अभ्यास पूर्ण झाला होता, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी गुरुवारी दिल्या. दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर आपल्या पाल्यांना घेण्यासाठी पालकांनीही परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केली होती.

कॉपीमुक्तीसाठी पोलिस बंदोबस्त
कॉपीमुक्तीसाठी जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर मोठय़ा प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा कॉपीचे प्रमाण कमी राहण्याची आशा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने व्यक्त केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चांगले मार्क मिळतील
अभ्यास आणि नियोजनाप्रमाणे पेपर सोडवता आला. पहिलाच पेपर चांगला गेल्याने आनंदी आहे. चांगले मार्क मिळतील, अशी आशा आणि विश्वासही आहे. शिवानी राऊत, विद्यार्थिनी, कला शाखा.

परीक्षेची उत्सुकता
मराठी माझा आवडता विषय आहे. त्यामुळे परीक्षेची उत्सुकतेने वाट पाहत होतो. दिलेल्या वेळेत पूर्ण पेपर सोडवता आला. प्रश्न अतिशय सोपे वाटले. अंकुश भांडे, विद्यार्थी, विज्ञान शाखा.

भरपूर गुण मिळतील
मराठीचा पेपर सोपा होता. बर्‍याच विद्यार्थ्यांना पहिला पेपर असला, की थोडासा ताण येतो. पण, अभ्यास पूर्ण झाल्याने सर्व प्रश्न सोडवता आले. मराठीत भरपूर मार्क मिळतील, याची खात्री आहे. निरज दारोकार, विद्यार्थी, विज्ञान शाखा.

जिल्ह्यात शाखानिहाय विद्यार्थी
कला - 12853 पुनर्परीक्षार्थी - 2370
वाणिज्य - 2879 पुनर्परीक्षार्थी - 489
विज्ञान - 9918 पुनर्परीक्षार्थी - 738
व्होकेशनल - 4792
पुनर्परीक्षार्थी - 468


जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे
जिल्ह्यात नियमित विद्यार्थ्यांसाठी 120 परीक्षा केंद्रे आहेत, तर पुनर्परीक्षार्थींसाठी 16 परीक्षा केंद्रे आहेत.