आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, Physics Paper Derangement Issue At Amravati, Divya Marathi

भौतिकशास्त्राच्या पेपरला गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी- इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून, मंगळवारी (दि. 25) भौतिकशास्त्राच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना लॉग टेबल उपलब्ध करून दिला नसल्याने येथील जिजामाता कन्या ज्युनियर कॉलेजमध्ये गोंधळ उडाला होता. परिणामी, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी संतप्त विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी केली आहे.
बारावीच्या परीक्षेला 1,322 विद्यार्थ्यांपैकी जिजामाता कन्या ज्युनियर कॉलेज या परीक्षा केंद्रावर 150 विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट आहेत. 25 फेब्रुवारीला भौतिकशास्त्राच्या पेपरकरिता या केंद्रावरील क्रमांक चार ते नऊ या खोल्यांतील विद्यार्थ्यांना लॉग टेबल उपलब्ध करून देण्यात आला नाही. या पेपरमध्ये 70 गुणांपैकी 35 गुणांचे प्रश्न हे लॉग टेबलवर आधारित असतात. हा लॉग टेबल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माध्यमिक बोर्डाची आहे; परंतु लॉग टेबलच मिळाले नसल्याने 35 गुणांचे नुकसान होणार असल्याची बाब पाल्यांनी आपल्या पालकांना सांगितली. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता, उडावाउडवीचे उत्तरे दिली गेल्याचे पालकांनी सांगितले. या प्रकारामुळे पालकांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, अमरावतीच्या सचिवांना निवेदनाद्वारे पेपर पुन्हा घेण्याची मागणी केली.
गोंधळात वीस मिनिटे गेली वाया
परीक्षेदरम्यान लॉग टेबल दिला नसल्यामुळे उडालेल्या गोंधळात विद्यार्थ्यांची महत्त्वाची तब्बल 20 मिनिटे वाया गेल्याची माहिती परीक्षार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.