आय वाचॅ पोलिस / आय वाचॅ पोलिस अॅप्‍स अमरावतीकरांच्‍या सेवेत

प्रतिनिधी

Mar 03,2015 04:16:00 AM IST
अमरावती - आपत्कालीन स्थितीत महीलांना पोलिसांची कुटूंबियांची तातडीने मदत मिळावी म्हणून ‘आय वॉच पोलिस’ अॅप्सची सेवा शहरात सुरू झाली आहे. सोमवारी पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला अॅप्स डेव्हलपर कंपनीचे प्रतिनिधी मिलिंद लगाडे यांनी ही सेवा सुरू झाल्याची घोषणा केली.
सोमवारी पोलिस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात ही सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. आमदार अॅड. यशोमती ठाकूर यासुध्दा यावेळी उपस्थित होत्या. अॅप्स कशापध्दतीने मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे, ते नेमके कशाप्रकारे काम करणार आहे. त्याचा वापर कसा करावा, त्यानंतर पोलिसांची भूमिका काय राहणार आहे, अशा बाबींची सविस्तर माहीती पोलिस आयुक्त लगाडे यांनी उपस्थित महिलांना दिली. राज्यात नागपूर, नाशिक पाठोपाठ या अॅप्सची सेवा देणारे अमरावती हे तिसरे शहर ठरले आहे.

हे अॅप्स सेवेत अाणण्यापुर्वी मागील तिन दिवसांपासून अमरावती पोलिस या अॅप्सची या अॅप्सवरून माहीती आल्यानंतर पोलिस यंत्रणा कशाप्रकारे काम करते, याची तालिम घेत होते. ही तालिम यशस्वी झाल्यानंतर साेमवारी हे अॅप्स लाॅंच करण्यात अाले. महिलांच्या सुरक्षेसाठी तयार झालेले हे अॅप्स कोणत्याही स्मार्टफोनवर प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात अालेल्या या अॅप्सचा महिलांनी फायदा घ्यावा असे अावाहन या प्रसंगी अामदार यशाेमती ठाकूर पोलिस अायुक्त डाॅ. सुरेश कुमार मेकला यांनी केले अाहे.
X
COMMENT