आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भाच्या पंढरीत जमला भाविकांचा मेळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘विदर्भाचीपंढरी’ असलेल्या कौंडिण्यपूर येथे कािर्तक पौर्णिमेपासून (दि. ६) सुरू असलेल्या यात्रा महोत्सवाची रविवारी (दि. ९) सांगता झाली. या महोत्सवानिमित्त कौंडिण्यपूरमध्ये शेकडो भाविकांचा मेळा जमला होता. पहाटे पाच वाजतापासून सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी अवघे कौंडिण्यपूर दुमदुमून गेले होते.

महोत्सवादरम्यान बडोद्याचे रामदास प्रभू महाराज यांच्या अमृतवाणीतून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. तुळशी विवाहाने सुरू झालेल्या महोत्सवात साधू संगम तसेच िवविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी (दि. ७) दुपारी दोन वाजता दहीहंडी फोडून प्रसाद वितरण; शनिवारी (दि. ८) लोकनाथ स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत अधिवास वैदिक अनुष्ठान आणि शिखर कलशाची स्थापना, तर सकाळी ११ वाजता सुदर्शनचक्र स्थापना, ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता "श्रीं'ची पालखी शोभायात्रा काढण्यात आली. रविवारी (दि. ९) पहाटे साडेचार वाजता महामंत्र जप करण्यात आला. सकाळी साडेसात वाजता दर्शन आरतीनंतर वैदिक महायज्ञ झाला. सकाळी नऊ वाजता कलश महाभिषेक करण्यात आला. संत समागमानंतर सकाळी ११ वाजता महाप्रसाद वितरणाने यात्रा महोत्सवाची सांगता झाली. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गोवर्धन मंदिर, भक्त निवासाचे लोकार्पण
इस्कॉनचेसंस्थापक आचार्य स्वामी श्रील प्रभुपाद यांचे शिष्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात आलेल्या मंदिर आणि भक्तनिवासाचे लोकार्पण रविवारी (दि. ९) झाले. चंद्रकुमार जाजोदिया, मीना इंगळे, जयवंत इंगळे, अक्रुरदास महाराज आदी उपस्थित होते. देश-विदेशातून भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी होमहवन, जप आदी धार्मिक कार्यक्रमांनी कौंडिण्यपूरचा आसमंत दुमदुमून गेला होता.