आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबी थंडीत मिळणार आनंद पर्वणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव कसबा - विदर्भातीलसातपुड्याच्या कुशीत वसलेल्या बहिरमबुवांच्या यात्रेला शनिवारपासून (दि. २०) सुरुवात होणार आहे. राहुट्यांसह विविध खेळणींची दुकाने, आकाशपाळणे, भिंगरीवाले, मिठाई, कापड दुकाने, भांड्यांची दुकाने, मातीच्या भांड्यांची दुकाने आतापासून थाटली आहेत.
विदर्भातील प्रसिद्ध असलेली ही यात्रा ३० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. बहिरमची यात्रा ३५० वर्षांहून अधिक काळापासून भरते. काहींच्या मते, ती हजारो वर्षांपासून भरते आहे. बहिरम बुवाचे मंदिर जवळपास १२५ फूट उंचीवर आहे. त्याचा शेजारी गणपतीची आठ ते दहा फूट उंच सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर दगडाचा नंदी आहे. दोन-अडीच एकरांच्या परिघात मंदिराचा परिसर असून, मंदिराच्या पायथ्याशी विविध दुकाने थाटली आहेत. येथे नवस फेडण्यासाठी विदर्भ आणि मध्य प्रदेशातून लोक येतात. गूळ, फुटाणे, रेवड्या हा देवाचा मुख्य प्रसाद आहे.

काशी तलावाची आख्यायिका प्रसिद्ध
बहिरमच्याडाव्या बाजूला प्रसिद्ध भांडीतलाव आहे. या तलावातून यात्रेकरूंना पुरेशी भांडी निघायची. पण कुणीतरी ही भांडी आपल्या घरी नेल्यापासून या तलावातून भांडी निघणे कायमचे बंद झाल्याची आख्यायिका आहे. आजही हा काशी तलाव पाण्याने तुडुंब भरलेला आहे. येथील राजाच्या महालाचे काही अवशेष काशी तलावासमोर भग्नावेशात आजही येथील गतवैभवाची साक्ष देतात. काशीची गंगा येथे वर्षाला अवतरते त्यामुळेच येथील तलावास काशी तलाव म्हणत असल्याचीही आख्यायिका आहे. आजही भाविक तलावाला आठवणीने भेट देत पुरातन वैभवाचा अनुभव घेतात.