आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍याची हत्या; पाच आरोपी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगावरेल्वे- दत्तापूर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जळगाव आर्वी येथील सुरेश डोमाजी महाजन या शेतकर्‍याची हत्या गावातील पाच जणांनी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या पाच जणांनी त्यांच्या शेतातील कापूस चोरला होता. बिंग फुटण्याच्या भीतीने त्यांनी महाजन यांची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिला, असे प्राथमिक तपासादरम्यान पुढे आल्याची माहिती दत्तापूरच्या ठाणेदार नीलिमा आरज यांनी दिली.

भजनसिंह पवार (25), सेवक भोसले (26), अईदसिंह काळे (40), सूरज भोसले (29) आणि सुगनचंद भोसले (45, सर्व रा. जळगाव आर्वी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरेश महाजन यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी भोगे यांच्या शेतातील विहिरीत सापडला होता. त्यानंतर तक्रार देताना भाऊ संतोष महाजन यांनी पोलिसांकडे काही जणांवर संशय व्यक्त केला होता. चौकशीअंती पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री या पाचही जणांना अटक केली. आरोपींची 26 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.