आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा, मृतदेह घेऊन गावकऱ्यांनी दिला ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शिराळायेथे विषबाधा झालेल्या शेतकऱ्याला डॉक्टर्सच्या गैरहजेरीमुळे वेळीच उपचार मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करून सोमवारी गावकऱ्यांनी मृतदेह आरोग्य केंद्रात ठेवून ठिय्या दिला.

सुरेश शंकरराव समरीत (४५ रा. शिराळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. समरीत यांना रविवारी सायंकाळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर, तत्काळ उपचारांची आवश्यकता होती. मात्र, त्यावेळी आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नव्हते. गावकऱ्यांनी संबंधित डॉक्टरांना फोन करून घटनेची माहिती दिली. मात्र, त्या डॉक्टर महोदयांनी, ‘आज माझी नाही, तर दुसऱ्या डॉक्टरची ड्यूटी आहे’, असे सांगितले. त्यानुसार, दुसऱ्या डॉक्टरला फोन केला असता, ‘माझी नसून त्याच डॉक्टरची ड्यूटी’, असल्याचे त्याने सांगितले. डॉक्टरांच्या या बेजबाबदारपणामुळे रूग्ण उपचारासाठी ताटकळत पडला होता. प्रकृतीचे गांभीर्य बघता गावकऱ्यांनी सुरेश समरीत यांना तातडीने अमरावतीला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच समरीत यांची प्राणज्योत मालवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे, संतप्त गावकऱ्यांनी समरीत यांचा मृतदेह सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रसमोर आणला. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. घटनेची माहिती कळताच, वलगांवचे ठाणेदार राध्येश्याम शर्मा आपल्या पथकासह िशराळा गावात पोहचले होते.

परिस्थितीवर लक्ष आहे
शिराळायेथे शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडला आहे. माहिती मिळताच पोलिस पथक गावांत दाखल झाले आहे. ग्रामस्थ ठिय्या मांडून बसले आहेत. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राध्येश्यामशर्मा, ठाणेदारवलगांव.

उपचाराअभावी गमावले प्राण
समरीतयांनी विष घेतल्यावर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यावेळी, डॉक्टर हजर नव्हते. डॉक्टर्ससोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, उपचाराअभावी समरीत यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे, आम्ही िठय्या मांडला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत, मात्र कारवाईशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. राजूगंधे, ग्रामस्थ,शिराळा. तथा पंचायत समिती सदस्य.
अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
शिराळायेथील प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो. ग्रामस्थांचे म्हणने ऐकले आहे. त्यावरून संबधित दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल. डॉ.नितीन भालेराव, जिल्हाआरोग्य अधिकारी.

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर असल्याचा आरोप
दर्यापूर सततचीनापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. दर्यापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथे ही घटना घडली. विठ्ठलराव गुलाबराव अढाऊ (६५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. विठ्ठलराव अढाऊ हे शुक्रवारी शेतात गेले होते. दरम्यान, त्यांनी िवषारी द्रव्य प्राशन केले. हे त्यांची पत्नी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथून अमरावती जिल्‍हा सामन्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान विठ्ठलराव अढाऊ यांचा मृत्यू झाला. विठ्ठलराव यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. त्यातच यंदा दुबार, तिबार पेरणी करूनही पीक हाती आले नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्याच्या पश्चात ृद्ध आई, पत्नी, दोन मुले आहेत.