आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - नापिकी तसेच कर्जापायी त्रासलेल्या शेतकऱ्याने स्वत:च्या घरामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली.तालुक्यातील कौंडिण्यपूर येथे मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री ही घटना उघडकीस आली.
गणेश किसनराव केवदे (५२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश यांच्याकडे असलेल्या कोरडवाहू सात एकर शेतीपैकी तीन एकर शेतात केवळ तीन पोते सोयाबीन झाले, तर उर्वरित शेतामधील कपाशीचे पीक लाल्या रोग आणि पाण्याअभावी वाळून गेले. दुबार, ितबार पेरणी करूनही हातामध्ये कोणतेही पीक आले नाही.

लोकांकडून घेतलेले कर्ज आणि मुलीचे लग्न कसे करायचे, या विवंचनेतील गणेश केवदे यांनी रात्री स्वत:च्या घराजवळ असलेल्या गुरांच्या गोठ्यात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे केवदे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, कुऱ्हा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.