आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; एकाचाहृदयविकाराने मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा / चांदूर रेल्वे - सततचीनापिकी, कर्जबाजारीपणा अन् त्यातच मुलीच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटना तिवसा चांदूर रेल्वे तालुक्यात मंगळवारी (दि. ९) उघडकीस आल्या.
विजय चंद्रभान बुटले (५३, आनंदवाडी,तिवसा) असे शेतात काम करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भांबोरा शिवरामध्ये बुटले यांनी उसनवारी तसेच पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून भावाची एक एकर, तर स्वत:ची दीड एकर अशी एकूण अडीच एकरांमध्ये सोयाबीन पेरले होते. मात्र, त्यांना फक्त तीन पोते सोयाबीन झाले. नापिकी आणि त्यातच दोन मुलींच्या लग्नाच्या चिंतेत बुटले होते असे कुटुंबीयांकडून समजते. दरम्यान, सोमवारी (दि. ८) त्यांनी गव्हाची पेरणी केली होती. आज सऱ्या पाडण्यासाठी बुटले दोन मजूर घेऊन शेतात गेले होते. दरम्यान, काम करताना त्यांना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. दुसरी घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील पोहराबंदी येथे घडली आहे.
रमेश बळीराम राठोड (४५, रा. पोहराबंदी) असे शेतातच गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. रमेश राठाेड यांच्याकडे आठ एकर शेती असून, पाच एकरांमध्ये फक्त पाच पोते साेयाबीन झाल्याने ते कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर अमरावती येथील कॉ-ऑपरेटिव्ह बँक, कठोरा नाका या शाखेतून ६० हजार रुपयांचे कर्ज होते. नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या कोंडीत अडकलेल्या रमेश राठोड यांना यंदा मुलीच्या लग्नाचीही चिंता होती. दरम्यान, प्राण्यांपासून तूर वाचवण्यासाठी सोमवारी (दि. ८) रात्री शेतात झोपयला जातो असे सांगून राठोड हातला शिवारातील शेतात गेले होते. त्यांनी शेतातच गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.