आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक वाचवण्याच्या धडपडीत दोन शेतक-यांची केली आत्‍महत्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन शेतकऱ्यांचा बळी, अनियमित भारनियमनाचा ‘करंट’

चांदूर रेल्वे - तातून गेल्यानंतर त्यातील काही रब्बीचे पीक वन्यप्राण्यांच्या तडाख्यातून वाचववण्यासाठी खरीपहंगाम हालावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणात आलेल्या अवेळी वीजप्रवाहाच्या झटक्याने आमदार वीरेंद्र जगताप यांच्या जवळा गावातील दोन शेतकऱ्यांना शुक्रवारी आपला जीव गमावावा लागला. पीक वाचवण्याच्या धडपडीत वीज कंपनीच्या अवकृपेने दोन शेतकऱ्यांचा बळी गेल्याने गावात वीज कंपनीविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

संतोष सुदामराव मोडक (४०), श्रीराम दामोदधरराव धोटे (५०) असे अनियमित भारनियमनाचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. दुबार, तिबार पेरणी करूनही कसेबसे दिसून येणारे पीकही वन्यप्राणी फस्त करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांच्या तावडीतून शेतातील पीक वाचवण्यासाठी शेतकरी सध्या जीवाचे रान करत आहेत. त्यातच पिकांना वाचवण्यासाठी नाइलाजास्तव शेताच्या चोहीबाजूने संरक्षण तारेमधून विद्युत प्रवाह सुरू केलेला असतो.
याच पद्धतीने संतोष मोडक यांनी आपल्या ३५ एकर शेतात कपाशी आणि हरभऱ्याची पेरणी केलेली आहे. जीवाचा आटापिटा करून ही पिके जगवण्यासाठी मोडक यांची धडपड सुरू होती. शुक्रवारी पहाटे श्रीराम धोटे यांना घेऊन मोडक शेतात गेले. माहिती मिळताच पोिलस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दोन दिवसांपासून वीजपुरवठा बंद
जवळागावातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता. पुलगाववरूनच ‘ब्रेक डाउन’ असल्यामुळे आम्हाला आज लाइन सुरू करणे गरजेचे होते. तसेही भारनियमन असले तरी सिंगल फेज लाइन सुरूच असते. त्यामुळे ब्रेक डाउन नसते, तर नियमित भारनियमनानुसार साडेनऊ वाजता लाइन येते. प्रवीणफडणवीस, कार्यकारीअभियंता, चांदूर रेल्वे.