आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर काढली त्याने विषाची बाटली, 3 तास शेतकऱ्यांचा ठिय्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- खचलेल्या विहिरींच्या बांधकामाचे अनुदान मिळाल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील अनेक शेतकरी शनिवारी (दि. २०) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. यावेळी एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच विषाची बाटली काढली. मात्र, बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांनी ती बॉटल जप्त केल्याने पुढील अनर्थ टळला. जवळपास तीन तास शेतकऱ्यांनी याच ठिकाणी ठिय्या दिला. अखेर प्रशासनाने दखल घेवून आगामी पाच दिवसांत अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खचलेल्या विहीरींचे बांधकाम पुर्ण केले मात्र शासनाकडून त्याचे अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. तातडीने अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार अनेक शेतकरी शनिवारी जिल्हाकचेरीवर धडकले होते. या शेतकऱ्यांनी खचलेल्या विहीरींचे बांधकाम पुर्ण करून एक महीन्यापेक्षा जास्त अवधी झालेला आहे. बांधकाम झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळणे अपेक्षित आहे. कारण आता खरीपाची पेरणी सुरू झाली आहे. मात्र विहीरींच्या बांधकामासाठी पैसा लागल्यामुळे आता पेरणी कशी करायची, असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे आहे.
त्यामुळेच आज शेतकरी जिल्हाकचेरीवर आले होते. शनिवारी दुपारी वाजतापासून या शेतकऱ्यांनी जिल्हाकचेरीसमोर ठिय्या दिला. मात्र तीन तास तोडगा निघाल्यामुळे ते बसूनच होते. याच दरम्यान यापैकी एका शेतकऱ्याने विषाची भरली बॉटल काढली. मात्र त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिास निरीक्षक पुंडकर यांनी ती जप्त केली.
तातडीने अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अखेर सांयकाळी ४.३० वाजताच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले आहे. आगामी पाच दिवसात ही रक्कम देण्याचे आश्वासनात नमूद आहे. यावेळी देवेन्द्र भुयार, अमित अढाऊ, उमेश डबरासे, सुमित गुर्जर, प्रशांत आमले, अंकुश कडू, दिनेश मालपे, सतिश पाटनकर यांच्यासह अन्य शेतकरी हजर होते.
बातम्या आणखी आहेत...