आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FDA Taken Action On Duplicate Mango Seller In Amaravati

कार्बाइड पावडरयुक्त ३०६ किलो आंबे जप्त, अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कारबाई डपावडरचा वापर करुन कृत्रिमरित्या आंबे पिकवणाऱ्या एका व्यापाऱ्याविरुद्ध अन्न औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल करून हजार ६५० रुपयांचे आंबे पावडरचा साठा जप्त करुन नष्ट केला.कृषि उत्पन्न बाजार समिती जुना कॉटन मार्केट येथे गुरुवारी (दि.२३) सकाळी अचानक झालेल्या या कारवाईमुळे फळविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जुना कॉटन मार्केट येथील फळांच्या सर्व घाऊक विक्रेत्यांची गुरुवारी तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये महेशकुमार बानोमल फ्रुट सप्लायर्स कमिशन एजंट अमरावती यांच्या पेढीची तपासणी केली. यावेळी सुमारे 306 किलो आंबे कारबाईड पावडरचा वापर करुन कृत्रिमरित्या पिकवत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे विक्रेता रवि कन्हैयालाल गणवाणी यांच्याकडून हजार ६५० रुपयांचे आंबे कारबाईड पावडरचा साठा जप्त करुन अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 च्या कलम ३८ (४) च्या तरतुदेनुसार नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मि. श. देशपांडे यांनी दिली अाहे.
या प्रकरणी जप्त केलेले आंब्यांचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित विक्रेत्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 च्या तरतुदीनुसार कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी कारबाईड गॅसचा वापर करुन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध धाडसत्र यापुढेही सुरुच राहणार असल्याचे अन्न औषध प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सदर कारवाई सह आयुक्त शिवाजी देसाई, सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी जयंत वाणे, राजेश यादव फरिद सिद्दिकी (दक्षता विभाग) यांच्या पथकाने केली.