आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटांत हाणामारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या युवकांसोबत एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा वाद झाला. या वादानंतर दोघांनाही आपआपल्या समर्थकांना बोलवल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. दोन गटातील वादात मध्यस्थी करताना जीआरपीचे कर्मचारी अशोक शेळके एका महिला कर्मचारी किरकोळ जखमी झाले. रविवारी सायंकाळी अमरावती मॉडेल रेल्वेस्थानकावर घडलेल्या या घटनेनंतर संतप्त झालेल्या काही महिला पुरूषांनी रेल्वे रुळावर ठिया दिला.शेवटी पोलिसांना पाचारण केल्यानंतर हे प्रकरण निवळले.
वडाळी परिसरातील रहिवासी विनोद भोसले त्यांचा भाऊ अजेस हे दोघेजण तिकीट रद्द करण्यासाठी अमरावती मॉडेल रेल्वेस्थानकावर आले होते. यावेळी भिंतीवर थुंकल्याच्या कारणावरून विनोद अजेस यांच्यासोबत रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या चार ते पाच जणांनी मारहाण केली. यावेळी पोलिसही त्या ठिकाणी उपस्थित होते,असा आरोप विनोद अजेस यांनी केला आहे. काही वेळानंतर विनोदचे सहकारी रेल्वेस्थानकावर आले. दहा ते पंधरा जणांच्या गटाने मदन ठाकूरदास निंदाने (६५ रा. बेलपुरा) यांना मारहाण केली. या प्रकरणाची त्यांनी जीआरपी पेालिसांत तक्रार दिली. दुसरीकडे कारण नसताना आम्हाला मारहाण करण्यात आली.
पोलिसांनी आमची तक्रारसुद्धा घेतली नाही,असा आरोप करीत विनोद भोसले त्यांच्या समर्थकांनी जवळपास पाऊण तास अंबा एक्स्प्रेसच्या समोर रेल्वे रुळावर ठिय्या दिला. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना दिली.माहिती मिळताच कोतवालीचे उपनिरीक्षक नीलेश चवरे आपल्या पथकासह, तसेच राखीव पोलिस दल क्युआरटीचे उपनिरीक्षक श्रीराम माचेवाड आपल्या दलासह रेल्वेस्थानकावर पोहोचले. विनोद भोसले यांची तक्रार घेण्यासाठी जीआरपी पोलिस रेल्वे रुळावर गेल्यानंतरच विनोद त्यांचे समर्थक रुळावरून उठले.
बातम्या आणखी आहेत...