आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध आर्थिक दंडाची तरतूद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अवैध दारूविक्रेत्यांकडून पाेलिसांनी माेठ्या प्रमाणावर बॅरल जप्त केले)
अमरावती- अवैध दारू विक्रेत्यांविरुध्द पोलिसांकडून होणारी कारवाई फारशी प्रभावी नसल्यामुळे दारू विक्रेते कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा आपला गोरखधंदा सुरू करतात. मात्र दारूविक्रेत्यांविरुध्द आर्थिक दंड करण्याची तरतूद दारूबंदी कायदा कलम ९३ मध्ये आहे. मात्र ही कारवाई पोलिस करू शकत नाहीत. यापुर्वी अनेक प्रकरण पोलिसांकडून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे गेले आहे. या प्रकरणावर तातडीने निर्णय व्हावेत, यासाठी शहर पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार आहे.
मुंबईतील मालवणी भागात विषाक्त दारूमुळे शंभरावर नागरिकांचे बळी गेले. त्यामुळे संपुर्ण राज्यात सध्या गावठी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केले आहे. शहरातही सध्या धडाक्यात पोलिसांकडून ही कारवाई सुरू आहे. आयुक्तालयातील दहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई सुरू आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दारूविक्रेत्यांना अटक केली जाते ही अटक फार जास्त काळासाठी राहत नाही. त्याच्याकडील दारूचा साठा जप्त केल्या जातो. मात्र त्यानंतर पुन्हा हा विक्रेता आपला व्यवसाय थाटतो. पोलिस पुन्हा कारवाई करून तिच प्रक्रीया केली जाते.
मात्र या कारवाईमुळे दारूची अवैध विक्री किंवा गावठी दारू गाळण्याचे काम बंद होत नाही. दारूविक्रेत्यांवर आर्थीक कारवाईची तरतूद आहे, मात्र हे अधिकारी उपविभागीय दंडाधिकारी यांना आहे. दारूबंदी कायदा कलम ९३ अन्वये दारूविक्रेत्यांकडून बॉन्ड लिहून घेऊन त्यापुढे जर तो विक्रेता दारूविक्री करताना पकडल्या गेल्या तर त्याने ज्या रकमेचा बॉन्ड लिहीला आहे, तेवढी रक्कम त्याला दंड म्हणून भरावा लागणार आहे. ही प्रक्रीया एकदा दंड भरून थांबणार नाही तर बॉन्ड लिहिल्यानंतर जितक्या वेळा त्याच्याविरुध्द पोलिसांकडून कारवाई होईल, त्या त्यावेळी ही रक्कम दंड म्हणून भरणा करावी लागणार आहे. पोलिस आयुक्तालयात यापुर्वी काही कारवाईमध्ये पोलिसांनी कलम ९३ चढे प्रकरण उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवले आहे मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही, अशी माहीती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, डीसीपी घार्गे यांनी स्वत: टाकली धाड...
बातम्या आणखी आहेत...