आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांत सहा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती पोलिस आयुक्तालयातर्फे मागील तीन महिन्यांत सहा बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.

इक्रामुद्दीन निजामुद्दीन (रा. जमील कॉलनी), फिरोजखाँ इस्माईलखाँ (रा. अन्सारनगर), मोहम्मद अशफाक अब्दुल वकील (रा. रहमतनगर), शे. कलीम शे. अजिज (रा. अकबरनगर), नजीरखाँ (रा. गुलिस्तानगर), सारिका चौधरी (राधानगर) यांच्यावर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 33 व 33 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बनावट डॉक्टरांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंह पवार यांनी दिले आहेत.

वैद्यकीय व्यवसायाचा मान्यताप्राप्त परवाना नसताना उपचार करणार्‍या डॉक्टरांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बनावट डॉक्टर शोधून काढण्यावर चर्चा झाली.

वैद्यकीय व्यवसायाचे रीतसर शिक्षण नसतानाही डॉक्टरचा बनाव करणार्‍यांवर जिल्हा प्रशासन गुप्तपणे नजर ठेवून आहे. अशा पद्धतीने व्यवसाय करणारे आढळल्यास आरोग्य अधिकार्‍यांना सूचना द्याव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.