आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतवारात मनपा मार्केटला आग, 40 दुकाने खाक, 40 लाखांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील इतवारा परिसरातील महापालिकेच्या फळबाजाराला बुधवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीत बाजारातील जवळपास 40 दुकाने खाक झाल्याने अंदाजे 40 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शहरातील भाजी व फळबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या इतवारा बाजारात महापालिकेचा फळबाजार आहे. या ठिकाणी एकूण 48 दुकाने आहेत. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या दुकानांमध्ये अचानकपणे आग लागली. सर्व दुकाने लागूनच असल्याने अवघ्या तासाभरात आगीने उग्र रूप धारण केले. प्रत्येक दुकानामध्ये आंबे, टरबूज, खरबूज, डाळिंब, केळी व अन्य फळ ठेवलेली होती. मात्र, आगीमध्ये सर्व फळांचा कोळसा झाला. बाजाराला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर व्यापार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीने तोपर्यंत भीषण रूप धारण केल्याने कोणत्याही व्यापार्‍याला दुकानातील माल बाहेर काढता आला नाही. अनेक विक्रेत्यांच्या हातगाड्याही आगीत जळून खाक झाल्या.

शेख शकिल शेख जमिल, शेख महबूब, गफ्फार खान, मुशीर खान बशीर खान, जाकिर खान रहीम खान, नवाब खान, वहाबभाई, अ. जाकिर अ. नबी, अ. वहाब अ. सय्यद, शेख रहीम, नासिर खान, बब्बू भाई नासिर खान, शेख गुड्ड, आसिफ खान पठाण, शेख मजीद शेख बशीर, सुनील बागडे यांच्यासह अन्य काही व्यापार्‍यांचे फळ, हातगाड्या व अन्य साहित्य आगीत खाक झाले. आगीची माहिती देण्यासाठी काही व्यापारी स्वत: अग्निशमन दलाच्या कार्यालयात गेले होते.