आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमरावती जि‌ल्ह्यात दोन ठिकाणी भीषण आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमरावती - जिल्ह्यात वरुड तालुक्यातील झटामझीरी मोर्शी तालुक्यातील लाडकी बुजरुक येथे लागलेल्या आगीमध्ये घरासह गुरांचा गोठा जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे ज्यांची घरे जळाली, त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. या दोन्ही घटना शुक्रवारी (दि. ८) घडल्या.

झटामझीरी येथे सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये आठ घरे जळून खाक झाली, तर एका घराचे आंशत: नुकसान झाले. हरीभाऊ धुर्वे, सुखवंती उईके, रीना सीरसाम, विठ्ठल सिरसाम, सुरेश मंडाने, सुखदेव सिरसाम, रतन धुर्वे, रामचंद्र धुर्वे आसे बेघर झालेल्यांची नावे आहेत. मनु आहाके यांच्या घराचे आंशत: नुकसान झाले आहे. घरातील आन्नधान्य गरजेचे साहित्य जळाल्याने प्रत्येक कुटुंबाचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

महसूल विभागाने केला पंचनामा : बेघरकुटुंबियांची जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आाली आहे. माहीती मिळताच महसुल विभाग पोलीस विभागाने घटनास्थळ गाठुन बेघर झालेल्या कुटुंबांचे सांत्वन करून मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंडळ आधिकारी बी. आर. फरकाडे, ग्रामसेवक संजय पाटील, पोलीस पाटील बिलादास पाटील, ठाणेदार आर्जुन ठोसरे तसेच सरंपच उपसरपंच सह गावातील नागरीक हजर होते.

मोर्शी येथे शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान लागलेल्या आगीमध्ये दहा ते बारा जनावरांचे गोठे एक घर आगीत भस्मसात झाले. वामन उंदरे यांच्या घरासह गोठ्यातील कडबा कुटार, शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले, तर ३० ते ३५ जनावरे भाजल्या गेली. त्यापैकी यामध्ये एकूण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रत्न केला. मोर्शी, वरुड, आमरावती, चांदूर बाजार येथून आलेल्या आग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठे नुकसान टळले. घटनेची माहिती मिळताच मोर्शीचे तहसीलदार विजय माळवी, तलाठी आनिल उमाळे यांनी घटनास्थळ गाठले. वीडीमुळे आग लागल्याचा प्राथमिक आंदाज वर्तवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...