आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंदूरजनाघाटमध्ये सिलिंडरचा भडका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथे जैन मंदिर परिसरातील उपाहारगृहातील सिलिंडरने अचानक पेट घेतला. एका 20 वर्षीय युवकाने धाडसाने दोन पेटते सिलिंडर बाहेर काढून नदीत फेकले. त्यापूर्वी शुक्रवारी (दि. 2) दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या आगीत 50 हजारांचे नुकसान झाले.

शेंदूरजनाघाट येथील जैनमंदिर परिसरात नेरकर यांच्या घरी भाड्याने जयसिंहराज पुरोहित यांचे उपाहारगृह आहे. खाद्यपदार्थ बनवत असताना दोन्ही घरगुती सिलिंडरनी गॅस गळतीमुळे पेट घेतला. त्यामुळे आजूबाजूच्या वस्तूही पेटत गेल्या. आग लागल्याचे कळताच लोकांची गर्दी झाले. त्यांच्यापैकी अभिजित सातपुते नामक युवकाने दोन्ही सिंलिडर उचलून नदीच्या पाण्यात फेकले. त्यामुळे ते निकामी झाले आणि पुढील अनर्थ टळला. घटनास्थळा पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. व्यवसायासाठी घरगुती सिलिंडरचा वापर केला जात होता, हे येथे उल्लेखनीय.