आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण आगीचा डोंब, १७ तासांनंतर मिळवले आगीवर नियंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एमआयडीसी परिसरात औषधीपूर्व केमिकल तयार करणाऱ्या एका कंपनीला रविवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांची हानी झाली. महापालिकेच्या अग्निशमन विभागासह मोर्शी, परतवाडा, चांदूर रेल्वे कारंजा लाड येथील पथकांनी सलग १७ तासांच्या अथक प्रयत्नांअंती आगीवर नियंत्रण मिळवले. बचाव कार्यादरम्यान ५० गाड्या पाण्याचा मारा, तर ९०० लिटर केमिकल फोमचा वापर केल्यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, शहरातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी आगीची घटना मानली जात आहे. दरम्यान, या आगीत कंपनीचे अंदाजे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी अग्निशमन विभागाला दिली आहे.
शहरातीलच परेश जे. राजा यांच्या मालकीची एमआयडीसीमध्ये प्लॉट क्रमांक डी-२ येथील लँक्सा फेम फॅमिली ऑर्गनाइज प्रा. लिमिटेड नावाची कंपनी असून, ही कंपनी आैषधीपूर्व केमिकल तयार करते. दीड वर्षांपूर्वीच येथे नूतनीकरण करून नवीन मशिनरी लावण्यात आली होती. रविवारी रात्री काम संपल्यानंतर कंपनीत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने या ठिकाणी आगीने पेट घेतला. आगीने हळूहळू रौद्र रूप धारण केले. या आगीत मिथाइल पँराविन, अद्ययावत मशिनरी, आैषधी, डेकोसेट सोडियम प्रोफाइल पँराविन आदी साहित्य खाक झाले. शिवाय कंपनीच्या इमारतीचे ५० टक्के नुकसान झाल्याचे संचालकांनी सांिगतले. त्याच कंपनीच्या मागील बाजूस जमिनीखाली दहा हजार लिटर केमिकलचा साठा साठवून ठेवला होता. त्या दिशेने आगीचे भडके उडत होते.
परंतु कंपनीतील अभियंत्याने प्रसंगावधान साधून वेळीच तेथील कॉक बंद केल्याने मोठी हानी टळली.
घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाने काही कळताच घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू केले. पाण्याचे फवारे उडवत अग्निशमन विभागाचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्तीचे प्रयत्न सुरू होते. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने पथकाला आग विझवणे कठीण झाले होते. तरीही अग्निशमन दलाने हार मानता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला. आगीचा आवाका लक्षात घेता बाहेरच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रात्रभर आग सुरूच होती. दरम्यान, रात्रीच्याच सुमारास राजापेठ पोलिस घटनास्थळी आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही अग्निशमन विभागाला सहकार्य केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी आग आटोक्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
रात्रभर जागला अग्निशमन विभाग : कंपनीलाआग लागल्याची माहिती दूरध्वनीवरून मिळताच मनपाचा अग्निशमन विभाग अवघ्या दहा मिनिटांच्या आत घटनास्थळी पोहोचला. रविवारी रात्री साडेनऊ वाजतापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. २५) दुपारी दोन वाजेपर्यंत अग्निशमन विभागाचे बचावकार्य सुरू होते. प्रभारी अग्निशमन अधीक्षक भरतसिंह चव्हाण यांच्या मागदर्शनाखाली विभागातील कर्मचाऱ्यांचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे अधीक्षक चव्हाण यांच्यासह त्यांची चमू रात्रभर जागी होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ५० गाड्या लागले पाणी...आतापर्यंतची सर्वांत मोठी आग...
बातम्या आणखी आहेत...