आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार प्रकरणात आणखी एकाला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चांदणीचौकातील गोळीबार प्रकरणामध्ये उपमहापौर शेख जफरचा सहकारी आरिफ लेंड्या याला रविवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सोमवारी पोिलसांनी याच गटातील नफिग ऊर्फ नफ्फू याला अटक केली आहे.
आरिफ लेंड्याला अटक करून झडती घेतल्यानंतर पोलिसांना देशी कट्टा सापडला. सोबतच काही काडतुसेही जप्त करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांपैकी सहा जण जफरच्या गटातील आहेत. जफर अद्यापही फरार अाहे.

उपमहापौर शेख जफरचा निघणार वॉरंट
गोळीबारप्रकरणात उपमहापौर शेख जफरविरुद्ध नागपुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोळा दिवसांनंतरही जफर मिळून आल्यामुळे जफरला फरार घोषित करावे, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी न्यायालयाकडे पूर्तता केली आहे. त्यामुळे मंगळवारी जफरचा वॉरंट निघण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या निर्णयानंतर पोलिस जफरच्या मालमत्ता जप्तीसाठी आवश्यक ती कारवाई करणार आहे.

आरिफ लेंड्याकडून देशी कट्टा, काडतूस केले जप्त