आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसेवकावर गोळीबार; लुटारूंना झाला कारावास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बँकेतून काढलेली लाख १९ हजारांची शासकीय रक्कम घेवून जात असताना दोन लुटारूंनी सहा वर्षापुर्वी ग्रामसेवकांवर गोळीबार केला होता. यावेळी ग्रामसेवकाने जीवाची पर्वा करता रक्कम बचावली हाेती. याप्रकरणी दोषी आढळलेल्या दोन लुटारूंना येथील जिल्हा सत्र न्यायाधिश क्रमांक एस. एम. भोसले यांच्या न्यायालयाने गुरूवारी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून अॅड. परीक्षित गणोरकर यांनी युक्तीवाद केला.
बाळू ऊर्फ मेघानंद पुनमचंद इसळ (वय, २५) आणि संदीप डिंगाबर वासनिक (२४ दोघेही रा. धोत्रा ता. तिवसा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत. तसेच या गोळीबारात जखमी झालेल्या ग्रामसेवकांचे नाव विनोद भीमराव इसळ (३५ रा. सन्मती कॉलनी अमरावती) असे आहे.
२००९ मध्ये इसळ हे गुरूकुंज मोझरी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ३१ मार्च २००९ ला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मोझरी येथील अलाहाबाद बॅकेमधून शासकीय निधीतील लाख १९ हजार ४१९ रुपयांची रक्कम धोत्रा येथील मजुरांना देण्यासाठीच इसळ यांनी काढली होती. ही रक्कम घेवून जात असताना शिरजगाव मोझरी ते धोत्रा मार्गावर दोन लुटारूंनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर देशी कट्टा रोखला. लुटारूंनी त्यांच्याकडील रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला.

बॅलेस्टीक रिपोर्ट डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली
इसळयांना गोळी मारणारे तोंडाला कापड बांधून होते. त्यामुळे सुरूवातीला इसळसुध्दा त्यांना ओळखू शकले नाहीत. इसळ यांच्यावर नागपूरात डॉ. करंदीकर यांनी शस्त्रक्रीया केली होती. त्यावेळी इसळ यांच्या शरीरातून काढलेली गोळी त्यांनी पोलिसांना तपासासाठी दिली. त्यामुळे त्यांची साक्ष तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस शरीरातून निघालेले काडतूस एकच असल्याचे जुळून आले. तसेच ही गोळी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या देशीकट्ट्यामधूनच चालवल्या जावू शकते, असे बॅलेस्टीक रिपोर्टमध्ये नमूद झाल्याने हा पुरावा महत्वाचा ठरला असल्याचे अॅड. गणोरकर यांनी सांगितले.