आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच हायटेक पोलिस ठाण्याचे आज लोकार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या नव्यानेच तयार झालेल्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन विजयादशमीच्या मुहूर्तावर पोलिस आयुक्त अजित पाटील यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. अमरावती पोलिस आयुक्तालयातील हे पहिले सुसज्ज असे ठाणे असणार आहे.

पोलिस आयुक्त कार्यालर्यालया जवळ दोन हजार 800 वर्गफूट जागेत ही सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. पाच मार्च 2012 ला गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. रविवारी आयोजित उद्घाटन सोहळ्यानंतर फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे नवीन इमारतीत नव्या जागेत स्थलांतरित होणार आहे. येथे महिला आणि पुरुष गुन्हेगारांसाठी स्वतंत्र कोठडी असेल. अपंग व्यक्तींचा विचार करून रॅम्प तयार करण्यात आला आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच शस्त्र ठेवण्यासाठी सुरक्षा खोली तयार करण्यात आली आहे.

ठाण्यासाठी एकूण दहा खोल्या असून ठाणेदार, डी. बी. स्कॉड, क्राइम ब्रांच अशा आवश्यक सर्व घटकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राजेंद्र वाघ यांनी दिली. ठाण्याच्या आवारात पार्किंगसाठी ऐसपैस जागा असून, रविवारी उद्घाटन सोहळ्यात वृक्षारोपणसुद्धा करण्यात येणार आहे.