आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Time In Mumbai To Nagpur Air Conditioner Bus Started News

उपराजधानी ते राजधानी ‘शिवनेरी’ची सवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विधिमंडळाच्यानागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी ते उपराजधानीदरम्यान वाढणारी वर्दळ बघता एसटी महामंडळाने पहिल्यांदाच मुंबई ते नागपूर शिवनेरी वातानुकूलित सेवा सुरू केली आहे. सुमारे महिनाभर (डिसेंबर ते जाने. ५) प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई येथून निघालेली ही बस अमरावती येथे पहाटे ५.१५ ला, तर नागपूर येथून निघालेली बस रात्री ९.३० वाजता अमरावती स्थानकावर पोहोचेल.हिवाळी अधिवेशनकाळात नागपूरला संपूर्ण राज्यभरातून गर्दी होते. मात्र, महागड्याति‍कीट दरांमुळे (२,३०० रुपये) या सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असून, बड्या ‘माशां’साठीच ही सेवा असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, नागपूर अधिवेशनासाठी प्रथमच अशा प्रकारची सेवा उपलब्ध केल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोबतच महागड्या तिकीट दरांवर प्रवाशांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे.
थेट राजधानीसोबत जोडणाऱ्या या सेवेमुळे नागपूरसोबतच अमरावती, अकोला, अौरंगाबाद, अहमदनगर पुणे आदी ठिकाणच्या प्रवाशांनासुद्धा लाभ होणार आहे. ऑनलाइन आरक्षणाची सुविधा आहे. याशिवाय राज्यातील आरक्षण केंद्रांवरूनही मुंबई-नागपूर प्रवासाचीति‍कीट आरक्षित करता येणार आहे, असे महामंडळाने स्पष्ट केले.
-मुंबई सेंट्रल येथून दुपारी तीन वाजता सुटलेली बस पहाटे ५.१५ ला अमरावतीला पोहोचणार आहे. नागपूर येथून मुंबईला जाण्यासाठी अमरावती स्थानकावर रात्री ९.३० वाजता ही बस मिळेल. अमरावती ते मुंबई प्रवासासाठी १९८५ रुपये, तर अमरावती ते नागपूरसाठी ४१५ रुपये प्रवासभाडे आकारण्यात येईल. आर.एन. पाटील,विभागीयवाहतूक अधिकारी.
नाताळ तसेच न्यू ईयर साजरा करण्यासाठी जगभरातील पर्यटक गोवा कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गोव्याला येतात. त्यांची गर्दी बघता महामंडळातर्फे २० डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित शिवनेरी बससेवा सुरू करण्यात येत आहे. सहाशे किलोमीटरसाठी प्रवाशांकडून १४६० प्रवासभाडे आकारण्यात येईल.
मुंबई टू नागपूर व्हायापुणे
मुंबईसेंट्रल येथून दुपारी तीन वाजता ही बस सुटेल. तेथून दादर-कुर्ला, नेहरूनगर- मैत्री पार्क - वाशी हायवे- नेरुळ फाटा- कोकण भवन- खारघर- कळंबोली हायवे- शिवाजीनगर (पुणे)- अहमदनगर- आैरंगाबाद- जालना- चिखली- खामगाव- अकोला- मूर्तिजापूर- अमरावतीमार्गे बस नागूपरला पोहोचेल. सुमारे नऊ जिल्ह्यांमधून ९०० किलोमीटरचा प्रवास ती करेल.