आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरखेड प्रकरणातील फरार पाच आरोपींना अखेर अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( तुरखेड प्रकरणातील अटक केलेल्या अारोपींसह तपास अधिकारी. )
अमरावती - चोरीचाडाव उधळून लावल्याने तुरखेड येथील ग्रामस्थांना मारहाण करुन पसार झालेल्या पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना बुधवारी (दि. १) यश आले आहे. पिंटू पालवे (२८), शंकर मोरे (२६), अंकुश पालवे (२५) या तिघांना सातपुडा जंगलातून, तर शिवा सुरतने (२३) रुईखेड-महागाव मार्गावर नाकाबंदी दरम्यान बजरंग पालवे (२६) याला अटक केली. आमदार बच्चू कडू यांना दिलेला शब्द पाळून अंजनगाव पोलिसांनी शिताफीने आरोपींना गजाआड केले आहे.
तुरखेड येथे २६ जुनच्या रात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या सात तरुणांना संशयास्पद स्थितीत ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ग्रामस्थांनी कोणतीही फिर्याद दिल्याने शेवटी पोलिस उपनिरीक्षक छत्रपती घावट यांनी फिर्याद नोंदवली. अंजनगाव न्यायालयात सातही जणांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांची जामीन मंजूर केली. यातील चार ते पाच आरोपींनी रागाचा वचपा काढण्यासाठी तुरखेड येथे जाऊन काही ग्रामस्थांनी मारहाण केली.
नागरिकांनी अंजनगाव पोलिस ठाणे गाठून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देत आंदोलन सुरू केले. यामध्ये आमदार कडू यांनी मध्यस्थी करत पोलिसांना आरोपींना अटक करण्यास बजावले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गजानन पडघण, संतोष वर्धेकर, ज्ञानेश्वर निरगुडे, सागर जाधव, ज्ञानेश्वर अगळते, विलास पटोकार, हरीष वैद्य, संदीप सिरसाठ, रवी मोरे, सुजीत होगले, कैलास खेडकर करीत आहेत.

आश्वासनाची पूर्तता
तुरखेड ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू करताच आमदार कडू यांनी आरोपींना शोधण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला होता. पोलिसांनी दिवसरात्र एक करून आरोपींना पकडण्यात यश मिळवले आमदार कडू यांना दिलेला शब्द पाळला.
शांतताबैठक
मार्डीतुरखेड गावामध्ये शांतता मैत्रीपुर्ण संबंध राहण्यासाठी आकाेट पोलिस ठाण्यामध्ये दोन्ही गावातील नागरिकांना बोलावून मंगळवारी शांतता बैठक घेण्यात आली.