आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Accused Abandon Food In Jail Issue At Amravati

पाच आरोपींचा कारागृहात अन्नत्याग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - खंडेलवाल दरोडा प्रकरणातील पाच आरोपींनी शुक्रवारपासून कारागृहातच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे. प्रकरणाचा निकाल तत्काळ लावावा, अशी या आरोपींची मागणी आहे.

शहरातील जयस्तंभ चौकात 2010 मध्ये भरदिवसा दरोडा पडला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. येथील मध्यवर्ती कारागृहात दोन महिला व सहा पुरुष असे आठ आरोपी खंडेलवाल दरोडा प्रकरणातील आहेत. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील आरोपींना कुठलाही सबळ पुरावा नसताना पकडले होते. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. प्रकरणात न्यायालयाने तत्काळ निकाल लावावा, अशी मागणी या आरोपींनी काही दिवसांपूर्वीच न्यायालयाला पत्र देऊन केली होती. लवकर निकाल न लावल्यास आम्ही कारागृहात अन्यत्याग करू, असा इशारासुद्धा त्यांनी दिला होता. अद्याप निकाल न लागल्याने शुक्रवारपासून त्यांनी अन्नत्याग सुरू केले आहे. सकाळी पाच आरोपींनी अन्न घेतले नाही. त्यांना कारागृह प्रशासनाने शुक्रवारी वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

जेवण घेतले नाही
खंडेलवाल दरोडा प्रकरणातील पाच आरोपींनी शुक्रवार सकाळपासून जेवण घेतले नाही. प्रकरणाचा निकाल तात्काळ लावावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. या पाच आरोपींना स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवले आहे. एच. बी. कुंटे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी.