आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Years Imprisonment For Rape Case Issue At Amravti

अत्याचारप्रकरणी पाच वर्षांचा कारावास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मतिमंद युवतीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 1श्री आनेकर यांनी सोमवारी पाच वर्षे कारवास व दंडाची शिक्षा सुनावली.
मिलिंद महादेव बन्सोड (36, रा. खरबी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर 28 वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 29 ऑगस्ट 2011 रोजी मिलिंदने मतिमंद युवतीवर गावाबाहेर नेऊन अत्याचार केला होता. घटनेच्या दिवशी मिलिंदने युवतीवर अत्याचार केल्याची माहिती पीडित मुलीच्या भावाला गावातीलच दोन महिलांनी दिली होती. पीडित मुलीचा भावाने त्याला पकडून गावच्या पोलिस पाटीलाकडे याची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून तळेगाव दशासर पोलिसांना मिलिंदला अटक केली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी मिलिंद बन्सोडविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणात सात साक्षीदार तपासले.

सात साक्षीदारांच्या साक्षीतून मिलिंदने अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला पाच वर्षे कारवास आणि 21 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी वकील अँड. सुनिल देशमुख यांनी युक्तिवाद केला. या घटनेने समाजमन सुन्न झाले होते.

‘त्या’ युवतीला 20 हजार देण्याचे आदेश : न्यायालयाने मिलिंद बन्सोडला पाच वर्षांच्या कारावासाबरोबरच 21 हजार रुपये दंड सुनावला आहे. यांपैकी 20 हजारांची रक्कम पीडित युवतीला देण्यात यावे, असे आदेशही या वेळी न्यायालयाने दिले असल्याची माहिती सरकारी वकील अँड. सुनील देशमुख यांनी दिली आहे.