आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कचेरीत ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पेढीनदीच्या पुरामुळे अमरावती तालुक्यातील वलगाव, रेवसा, देवरा, शिराळा, नांदुरा, पुसदा, देवरी, फाजलापूर, अंतोरा, सालोरा, टेंभा, गोपालपूर, कठोरा (बु.), कामुंजा, वझरखेड थुगाव (खानापूर), भातकुली तालुक्यातील धामोरी, तिवसा तालुक्यातील दुर्गवाडातील नागरिकांना बेघर व्हावे लागले.

याशिवाय याच भागातील पेढी बॅरेज धरणामुळे रोहणखेडा, पर्वतापूर, दोनद टेंभा येथील रहिवाशांना विस्थापित व्हावे लागले. या सर्वांच्या पुनर्वसनासाठी गतवर्षी १४ ऑगस्ट रोजी आमदार ठाकूर यांनी जिल्हा कचेरीवर उपोषण आंदोलन केले होते. शेवटी मध्यरात्रीच्या सुमारास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करून आंदोलन सोडवले होते. पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या रकमेपैकी २० कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी त्या वेळी दिले होते. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणी केली होती; परंतु गेल्या वर्षभरात त्या रकमेतील २० कोटी तर सोडा, दोन कोटी रुपयेही अमरावती जिल्ह्याला प्राप्त झाले नाहीत.

अधिकारीच वेठीस ?
आमदारअॅड. यशोमती ठाकूर यांनी ज्या कणखरपणे शुक्रवारी हा मुद्दा जिल्हािधकाऱ्यांच्या दालनात मांडला, तेवढ्याच ताकदीने त्या विधिमंडळात या विषयावर बोलल्या असत्या, तर हा मुद्दा केव्हाच निकाली निघाला असता. परिणामी, जिल्हािधकाऱ्यांना कोंडीत पकडण्याची गरज त्यांना भासली नसती. मात्र, सत्ताधारी आमदार असूनही त्यांनी आपली भूिमका सभागृहात मांडली नाही, असे काही जणांचे म्हणणे अाहे.