आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डेंग्यू’नियंत्रणासाठी येणार अकरा फॉगिंग मशीन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील‘डेंग्यू’च्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर महापालिका अकरा फॉगिंग मशीन्स घेणार आहेत. नागरिकांच्या तक्रारींमुळे रमाई घरकुलसाठी नेमण्यात आलेली ‘पेव्हटेक’ एजन्सी बदलली जाणार आहे. सोबतच, मागील वर्षीच्या क्रिडा रत्न पुरस्काराचे वितरण सुद्धा करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी सांगितले.

अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले असून यंत्रणा अपूरी पडत असल्याचे दिसून येत आहे. ‘डेंग्यू’च्या फैलावास कारणीभूत डासांना प्रतिबंधासाठी एक मोठी दहा लहान फॉगिंग मशीन्स खरेदी करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अरूण डोंगरे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मंगळवारी यावर शिक्‍कामोर्तब झाले. त्यामुळे, आरोग्य विभागाकडे आता एकूण २० फॉगिंग मशीन्स राहणार आहेत.

रमाई घरकूल योजनेबाबत तक्रारी असणाऱ्या नागरिकांनी सोमवारी महापालिकेवर धडक दिली. याची दखल घेत घरकुलासाठी नेमण्यात आलेली ‘पेव्हटेक’ कंपनी बदलली जाणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले. सोबतच, विभागातील त्रासदायक ठरलेल्या लिपिकांची बदली देखील करण्यात आल्याचे समजते. ‘पेव्हटेक’ कंपनीच्या ठिकाणी नवीन एजन्सी नेमली जाणार असून आगामी स्थायी समिती बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब होणार आहे. यावेळी माजी महापौर विलास इंगोले, माजी सभापती सुगनचंद गुप्ता, जयश्री मोरे, अजय गोंडाणे, धिरज हिवसे, प्रवीण हरमकर, कांचन उपाध्याय, सारीका महल्ले, वंदना हरणे, डॉ. राजेंद्र तायडे, योजना रेवस्कर, कुसूम साहू, कांचन डेंडूले, अंबादास जावरे, नूर खान मौजदार खान आदी स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.