आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरातील विश्वकर्मा ज्वेलर्सवर "आयकर'ची धाड, सुवर्ण व्यावसायिकांमध्ये खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर -येथील सुवर्ण व्यावसायिक विश्वकर्मा ज्वेलर्सच्या प्रतिष्ठानवर गुरूवारी
(दि१५) आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्याने सुवर्ण व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दर्यापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत लोंधे बंधू विश्वकर्मा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आयकर विभागाचे आठ ते दहा अधिकारी फोर्ड (क्रमांक एमएच २७-बीएफ-००३७) गाडीने आले. त्यांनी थेट विश्वकर्मा ज्वेलर्समध्ये प्रवेश करून चौकशी करणे सुरू केले. दागिने आभूषणांचीही कसून चौकशी करण्यात येत होती. दरम्यान, दुकानातील दस्तावेज ताब्यात घेऊन वृत्ति‍ लिहिस्तोवर रात्री उशीरापर्यंत दुकानाचे शटर बंद करून तपासणी सुरू होती. या कार्यवाहीतून नेमके काय आढळले याबाबत बोलण्यास चमूचे नेतृत्व करणारे अधिकारी गुलारेकर यांनी नकार दिला. आयकर विभागाच्या मुख्य कार्यालयातूनच पुर्णपणे माहिती मिळेल असे ते म्हणाले.