आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात लक्ष ठेवण्यासाठी, वन अधिकारीच घालताहेत अाता गस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागीलतीन दिवसांपासून वनपाल, वनरक्षक तसेच अनेक ठिकाणांच्या वनमजुरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जंगलाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. अशावेळी अधिकाऱ्यांनी स्वत: उपलब्ध कर्मचाऱ्यांसोबत जंगलात गस्त घालण्याचे आदेश प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी बुधवारी दिले आहेत. त्यामुळे स्वत: अधिकारी जंगलात गस्त घालत अाहेत.
जंगलाच्या सुरक्षेसाठी नेहमी वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर तैनात असतात. मात्र त्यांच्या न्याय्य मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी २५ ऑगस्टपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. जिल्ह्यातील जवळपास दीड हजार वन कर्मचारी संपात सहभागी आहेत. या संपामुळे जंगलाच्या सुरक्षेचा मुद्दा वनविभागापुढे उभा झाला आहे. वनपाल, वनकर्मचारी किंवा वनमजूर कामावर नसल्यामुळे स्वत: अधिकाऱ्यांनी असेल त्या मनुष्यबळाला सोबत घेऊन जंगलात गस्तीवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश मिळाल्यामुळे बुधवारपासून वन अधिकारी स्वत: जंगलात गस्तीवर गेले आहेत. अधिकारी गस्तीवर गेले असले तरी काही आणीबाणीची वेळ आल्यास वनविभागाकडे पुरते मनुष्यबळ नाही. अशावेळी ऐनवेळी मदत कोणाची घेणार, हा प्रश्न वनविभागापुढे आहे. त्यामुळे जोवर वनकर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली निघणार नाहीत, तोवर वन अधिकाऱ्यांना जंगलात गस्त घालावी लागणार आहे.
जंगलात गस्तीवर गेल्यानंतर अधिकाऱ्यांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत माहिती द्यावी. अशावेळी पर्यायी व्यवस्था म्हणून अधिकाऱ्यांच्या मदतीला होमगार्ड जवानांना देण्यात येईल. त्या दृष्टीने वनविभागाने व्यवस्था केली आहे. मात्र, २९ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणोशोत्सवाच्या काळात होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असतात. वनकर्मचाऱ्यांचा संप अधिक काळ सुरू रािहल्यास होमगार्डसुद्धा वनविभागाला कशी सेवा देणार, हा प्रश्न वनविभागापुढे आहे.