आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Deputy CM Ajit Pawar, Latest News In Divya Marathi

राकाँकडेच राज्याच्या विकासाचे खरे व्हिजन- अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्याच्याकायापालट करण्याचे व्हिजन राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंभर दिवस पूर्ण करणारे केंद्रातील मोदी सरकार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले.

बडनेरा जुनी वस्तीच्या चमननगरातील अलमास ग्राउंडमध्ये गुरुवारी सायंकाळी पवार यांनी प्रचारसभा घेतली. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस गणेश रॉय, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष नितीन हिवसे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, मनपातील गटनेते सुनील काळे, माजी उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे, महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष नीलिमा महल्ले, शहराध्यक्ष नगरसेवक सपना ठाकूर, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद अफजल यांच्यासह जिल्ह्याच्या विविध मतदारसंघांचे उमेदवार आदी उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याची राकाँची भूमिका आहे. पक्षाने कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. त्यामुळे मागणी नसतानाही पक्षाने मुस्लिम समाजाला आरक्षण िदले. बडनेरा अमरावती जिल्ह्यांच्या विकासासाठी राणा यांनी आणलेल्या प्रस्तावांनाही मंजुरी दिल्याची माहिती या प्रसंगी पवार यांनी िदली. या वेळी नवनीत राणा, उमेदवार रवि राणा, गणेशदास गायकवाड आदींची भाषणे झाली. संचालन आभारप्रदर्शन नगरसेवक प्रा. विजय नागपुरे यांनी केले.
बडनेरातील चमननगर भागातील अलमास ग्राउंडमध्ये अायाेजित सभेस उपस्थित महिला. इन्सेट अजित पवार.
रवी राणा माझा लहान भाऊ
आपल्याभाषणात अजित पवार यांनी रवि राणा यांचा उल्लेख लहान भाऊ असा केला. ते म्हणाले, हा धडपडणारा तरुण आहे. काम करण्याची िजद्द त्यात आहे. अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव अपक्ष तरुणाला राष्ट्रवादीने पाठिंबा िदल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले.
अजितदादाच माझी ताकद
महाराष्ट्रातज्यांचा शब्द काळ्या दगडावरची रेघ ठरतो, ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच माझी खरी ताकद आहेत. मतदारसंघाच्या िवकासासाठी त्यांनी मला मोठी मदत केली आहे. आज त्यांच्या हस्ते कमलीवाले बाबा यांच्या दरगाहवर चादर चढवली गेली. त्यामुळे भविष्यात ते िनश्चितच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला.