आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे शहरात स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे शहरात आगमन झाले. याप्रसंगी त्यांचे स्वागत करताना जिल्हाधिकारी किरण गित्ते, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर. छाया: मनीष जगताप
अमरावती - देशाच्यामाजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे शनिवारी दुपारी शहरात आगमन झाले आहे. त्यांच्या आगमनामुळे शासकीय विश्रामगृह तसेच माजी राष्ट्रपतींच्या निवासस्थान देवी सदन परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रतिभाताई पाटील जवळपास सहा ते सात दिवस शहरात थांबणार आहेत. शनिवारी दुपारी अडीच वाजता नागपूरवरून मोटारीने त्यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. या वेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे आदींनी त्यांचे स्वागत केले. विश्रामगृहावर एक तासाच्या विश्रांतीनंतर त्या काँग्रेसनगर स्थित देवी सदन येथे पोहोचल्या. पाच वाजताच्या सुमारास भूमिपुत्र कॉलनीमध्ये एका नातेवाइकांकडे भेट दिली. भूमिपुत्र कॉलनीमधून त्या पुन्हा देवी सदनावर जाणार असून, त्याच ठिकाणी आगामी दिवसांत त्यांचा मुक्काम राहणार आहे. त्यामुळे देवी सदनाच्या परिसरात शनिवारी सकाळपासून फ्रेजरपुरा पोलिसांसह अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहावर त्या आल्यानंतर शहरातील काही मंडळींनी माजी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गर्दी केली होती.
बातम्या आणखी आहेत...